Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एचपीव्ही लसीकरण संदर्भात ब्राम्हणगाव मध्ये प्रबोधन

कोपरगाव शहर : महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्वायकल कॅन्सर) ही एक गंभीर समस्या बनत असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलींना योग्

लातूरमध्ये उष्माघाताने 9 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूचा संशय
14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन
आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत; सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे : मंत्री आबिटकर

कोपरगाव शहर : महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्वायकल कॅन्सर) ही एक गंभीर समस्या बनत असून, त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुलींना योग्य वयात ‘एचपीव्ही’ लस देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आयुष्मान आरोग्य मंदिर, ब्राम्हणगाव चे समुदाय आरोग्य अधिकारी संकेत पोटे यांनी  केले. माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणगाव मध्ये आरोग्य उपकेंद्राच्या वतीने आयोजित ‘ १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे एचपीव्ही’ लसीकरण जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.  
 पोटे यांनी पुढे बोलताना सांगितले की, एचपीव्ही हा विषाणू महिलांमध्ये कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतो. या आजारापासून बचावासाठी मुलींना ही लस देणे अत्यंत प्रभावी ठरते. तर ही लस पूर्णतः सुरक्षित असून, पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तर उपस्थित असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे यांनीही भविष्यातील आरोग्य धोके टाळण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सुज्ञ पालक स्वतःहून आपल्या पाल्यांच्या लसीकरणासाठी पुढे येत आहेत, ही सकारात्मक बाब असून भविष्यातील कर्करोगासारख्या गंभीर समस्यांवर आजच लस टोचून घेणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले. या प्रसंगी आरोग्यसेविका टी .पी. बारगजे , आरोग्य सेवक  गावडे एस बी,  सोनवणे एच.बी.यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद, सर्व आशासेविका आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS