Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान

बेलापूर ः बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांना ग्रामीण विकास सेवा संस्थेचा राज्यस्तरीय मह

राहुरी तालुक्यातील गुहा येथील मध्यवस्तीतील वेश्या व्यवसायावर छापा
अयोध्याला जावं की नाही हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न-बाळासाहेब थोरात
LOK News 24 I अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार

बेलापूर ः बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांना ग्रामीण विकास सेवा संस्थेचा राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्कार नुकताच अहमदनगर येथिल निमगाव वाघा येथे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान झाला आहे.त्यांना ग.दि.माडगूळकर शब्दसृष्टी,शांता शेळके साहित्यगौरव, संत कबीर काव्यसरिता आदि 25 पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत.

रानभरारी, मी सूर्याच्या कुळाची, वादळांना झेलताना, वांझोटे वार आदि 10 पुस्तके त्यांच्या नावे तर तर 10 संपादीत पुस्तके आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्या प्रशासकीय सेवेत काम करतात.एकूण 16 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आहे. त्या बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ निवडसमितीच्या मुलाखतीतून निवड झालेल्या पहिल्या प्रोफेसर आहेत. त्यांच्या या कर्तुत्वाबद्दल या संस्थेने त्यांचा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे. या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक नाना डोंगरे, पो.नि. ज्योती गडकरी, पो.नि.अनिल कटके, पो.नि.राजेंद्र सानप, विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री मुकुंद गंधे, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, विजय साबळे, विषय तज्ज्ञ प्रियंवदा कुलकर्णी ,विषय शिक्षक लता बोरुडे, प्रति गाडगेबाबा फुलचंद नागटिळक, शिवव्याख्याते अभय जावळे, शिवशाहीर विक्रम अवचिते, औरंगाबादचे प्रा.डॉ.शैलेंद्र भणगे, नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन साहेबराव बोडके,डॉ.विजय जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.सचिन डोंगरे, मंदाताई डोंगरे, प्रतिभा डोंगरे, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या उपाध्यक्ष प्रियंका डोंगरे आदि उपस्थित होते.
सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ.कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या स्री सन्मानाच्या संस्काराची जाणीव करुन दिली तर राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्वच्छता व माणसातच देवत्व आहे या मूल्यांची जाणीव करुन दिली.पुढे त्या म्हणाल्या की, पो नि अनिल कटके ,ज्योती गडकरी,पो.नि. राजेंद्र सानप यांना उत्कृष्ट कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पुरस्काराने सन्मानित कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी आहेत. सदर प्रसंगी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.यात बेलापूर महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कोमल कांदळकर हिला निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.त्यांच्या या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, सचिव अ‍ॅड शरद सोमाणी, खजिनदार हरिनारायण खटोड,सहसचिव दिपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, भरत साळुंके ,रविंद्र खटोड,राजेंद्र सिकची, विश्‍वस्त नंदूशेठ खटोड, श्रीवल्लभ राठी, बापूसाहेब पुजारी शेखर डावरे ,लीलावती डावरे, हरिश्‍चंद्रपाटील महाडिक, नारायणदास सिकची, डॉ. सुरेश मुथ्था, प्रेमा मुथ्था,श्रीकृष्ण भालेराव,सौ.सुविद्या सोमाणी, प्रा.हंबीरराव नाईक, अ‍ॅड.विजय साळुंके, प्रा.विलास गायकवाड, डॉ. विठ्ठल सदाफुले, डॉ.बाबासाहेब पवार,प्रा.प्रकाश देशपांडे, कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर, शिक्षक प्रतिनिधी प्रा. सुनिता ग्रोव्हर तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS