Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

लातूर प्रतिनिधी -  जिल्ह्यात गेल्या वीस-बावीस दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. यामुळे पिकांनी माना टाकल्या असून शेतकर्‍यांमध्ये चिंता वाढली आहे. या

कोरोनानंतर आता आला नोरोव्हायरचं संकट ; सापडले २ रुग्ण | LOK News 24
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी गंगाथरन डी.
नवाब मलीक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ! | LOKNews24

लातूर प्रतिनिधी –  जिल्ह्यात गेल्या वीस-बावीस दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. यामुळे पिकांनी माना टाकल्या असून शेतकर्‍यांमध्ये चिंता वाढली आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा,या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी. या आठवड्यात शासनाने दुष्काळ जाहीर नाही केला तर मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही. जिल्ह्यातील शेतकरी सोबतीला घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकाचे नुकसान होत आहे. अशा शेतकर्‍यांनाही हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी. पुढील काळामध्ये शेतकर्‍यांना त्रास होणार नाही, यासाठी हरिण, रानडुक्कर या वन्य प्राण्यांचा प्रतिबंध करावा. जिल्ह्यातील पिके वाळत असल्याने पीक विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम तत्काळ द्यावी. 992 व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकर्‍यांना विकणार्‍या विविध उत्पादन कंपन्यावर कारवाई करण्यात यावी. खत बियाणांची लिंकिंग तसेच कीटकनाशकांची विक्री चढ्या दराने करणार्‍या कृषी दुकानदारांवर ही कारवाई करावी. गोगलगाय व इतर अन्य रोगामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ मदत करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आठवडाभरात कोरडा दुष्काळ जाहीर न केल्यास मराठवाड्यातील कोणत्याच जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलन दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कृषी विभागाचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिला. प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, भागवत शिंदे, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, सचिन क्षीरसाट, प्रीती भगत, किरण चव्हाण, अंकुश शिंदे, वाहिद शेख,सचिन बिराजदार, संग्राम रोडगे, महेश बनसोडे, सोमनाथ कलशेट्टी, महेश देशमुख,श्रीनिवास शिंदे, महेश माने, अनिल जाधव,रामदास पाटील, संतोष भोपळे, सुनील तोडचिरकर, परमेश्वर पवार, जहांगीर शेख, बजरंग ठाकूर, अजिंक्य मोरे, ऋषिकेश माने, संतोष जाधव, शुभम चंदनशिवे, रामदास तेलंगे, गुरुदास घोणसे, अनिल भंडे, पवन राजे, दत्ता महात्रे, लाला मोहिते, पवन सरवदे, सचिन इगे, सुरेश गालफाडे आदींनी सहभाग घेत घोषणाबाजी केली.

COMMENTS