Homeताज्या बातम्याअहमदनगर

अशोक खरातचा बनावट खात्यातून 52 कोटींचा घोटाळापरदेशात पलायनाच्या तयारीचा असल्याचा तपासातून उलगडा

अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित आध्यात्मिक व्यक्ती अशोक खरात याच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती धक्कादाय

जामखेड तालुक्यात कर्ज वसुली ५१.४३ टक्के; ठेवींमध्येही विक्रम; जिल्हा बँकेची प्रगतशील कामगिरी
जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
शेवगावात अन्नभेसळविरोधी धडक कारवाई; दूध डेअरींवरील पदार्थांचे नमुने जप्त विक्रेत्यांत खळबळ
अशोक खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ! सुनावणीवेळी कोर्टात खरात काय  म्हणाला? Nashik Marathi News | Ashok Kharat's police custody extended  again! What did Kharat say in court during the ...


अहिल्यानगर : नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित आध्यात्मिक व्यक्ती अशोक खरात याच्याविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. अटकेची शक्यता निर्माण झाल्यानंतर खरात याने बनावट आणि बेनामी खात्यांच्या माध्यमातून तब्बल 52 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्यवहारांद्वारे काळा पैसा लपवून तो परदेशात पलायन करण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
तपास अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, कोपरगाव येथील एका पतसंस्थेत तब्बल 65 संशयित खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमधून अवघ्या काही दिवसांत दोनशेहून अधिक व्यवहार करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक व्यवहाराची रक्कम दोन लाखांच्या खाली ठेवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारांवरील तपास यंत्रणांचे लक्ष चुकवण्यासाठी प्रत्येकी एक लाख नव्याण्णव हजार रुपयांचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या सर्व खात्यांचा संबंध थेट अशोक खरात याच्याशी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अनेक खात्यांचे संचालन, व्यवहारांचे नियोजन तसेच नामनिर्देशित व्यक्ती म्हणून खरातचे नाव आढळल्याने तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे. तपासादरम्यान काही महसूल विभागातील अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभागाशी संबंधित व्यक्ती तसेच काही प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांच्या नावानेही खाती उघडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिक गंभीर बनले असून, संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. डिसेंबर 2025 मध्ये वावी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची पार्श्‍वभूमी तयार झाली होती. त्यानंतर जानेवारी ते मार्च या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात दिसून आले. अटक होण्यापूर्वीच निधी वेगवेगळ्या खात्यांतून काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चौकशीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला असून, खरात याने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलिया येथे पलायन करण्याची तयारी केली होती. परदेशातील संपर्कांच्या मदतीने कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा त्याचा विचार असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. यासाठी आवश्यक आर्थिक हालचाली आधीच सुरू केल्याचेही तपासातून उघड होत आहे.

COMMENTS