देवळाली प्रवरा : कधी कधी एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त होते… तर कधी अनोळखी माणसांच्या मदतीमुळे जगण्याची नवी उमेद मिळते. देवळाली प्रवरा येथील मच्छिंद्र बापू काळे यांच्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली. विजेची तार तुटून गोठ्यावर पडल्याने त्यांच्या आठ दुभत्या गाईंचा जागीच मृत्यू झाला आणि कुटुंबाचा प्रमुख आधारच हिरावला गेला. मात्र, या दुःखद प्रसंगानंतर समाजातील संवेदनशील माणसे धावून आली आणि माणुसकीचा हात पुढे करत काळे कुटुंबाला पुन्हा उभारी दिली.या घटनेची माहिती मिळताच रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात आणि त्यांच्या मित्रपरिवाराने तातडीने मदतीचा निर्णय घेतला. सर्वांनी लोकसहभागातून निधी उभारून काळे कुटुंबाला एक दुभती गाय भेट दिली. ही केवळ आर्थिक मदत नव्हती, तर संकटात खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास देणारी माणुसकीची भेट होती.गाय स्वीकारताना काळे कुटुंबाच्या डोळ्यांत अश्रू होते; मात्र ते दुःखाचे नव्हते, तर समाजाने दिलेल्या आधाराबद्दलच्या कृतज्ञतेचे होते. एका दुभत्या गाईमुळे पुन्हा त्यांच्या संसाराला आधार मिळणार असून भविष्यात नव्याने उभे राहण्याची आशा निर्माण झाली आहे.यावेळी नगरसेवक दासूभाऊ पठारे, उद्योजक शिवाभाऊ पाठक, राजाभाऊ खेवरे, बबनराव जऱ्हाड, साहेबराव गवळी, ज्ञानेश्वर बोरकर, अरविंद मोढवे, भाऊसाहेब कडू, जगन्नाथ पठारे, दत्तात्रय गवांदे, राजेंद्र मुसमाडे, गोविंद टिक्कल, अनिल पठारे, पत्रकार रफीक शेख, मन्सूरभाई शेख, करीम शेख, डॉ. संदीप मुसमाडे, किशोर पंडित, सागर संसारे, विठ्ठल मुसमाडे, राजेंद्र कदम, रमेश मुसमाडे आदी उपस्थित होते. समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केल्यास कोणतेही संकट मोठे राहत नाही, हा संदेश या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केला असल्याचे सुरेंद्र थोरात यांनी सांगितले.

COMMENTS