Homeताज्या बातम्यासंपादकीय

अशोक चव्हाणांचा भाजपप्रवेश

काँगे्रस पक्षाला आज घरघर लागलेली असतांना, त्या पक्षातील ज्येष्ठ नेते या पक्षातून बाहेर पडतांना दिसून येत आहे. त्यामुळे काँगे्रसने संरजामदार नेते

 बदल चिंताजनक
तापमानवाढीतील बदल
दुबार पेरणीचे संकट

काँगे्रस पक्षाला आज घरघर लागलेली असतांना, त्या पक्षातील ज्येष्ठ नेते या पक्षातून बाहेर पडतांना दिसून येत आहे. त्यामुळे काँगे्रसने संरजामदार नेते तयार केल्याचे दिसून येत आहे. भाजपने केवळ पक्षनिष्ठा महत्वाची मानत आला आहे, तर काँगे्रसमध्ये व्यक्तीनिष्ठा मोठी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँगे्रसला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.  काँगे्रसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँगे्रसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये रितसर प्रवेश केलेला आहे. त्यामुळे काँगे्रसच्या वाईट दिवसांत, सत्ता नसल्यामुळे त्यांचे एक-एक महत्वाचे चेहरे त्यांना सोडून जातांना दिसून येत आहे. वडिल मुख्यमंत्री, मुलगा मुख्यमंत्री अशी अनेक पदे चव्हाण कुटुंबीयांनी भोगले असतांना, चव्हाण यांच्यावर पक्षांतर करण्याची नामुष्की का ओढवली. अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यामुळे आणखी काही वर्षे सत्ता नसली तरी चव्हाण दम काढू शकले असते. मात्र तलवार अटकेची टांगती असेल तर, पक्षच काय, कुटुंब देखील फोडायला माणूस मागेपुढे पाहत नाही, याचा अनुभव महाराष्ट्राने घेतला आहे. त्यामुळे चव्हाण यांनी भाजपमध्ये उडी घेतल्याचे अनेकांना नवल वाटलेले नाही. खरंतर विलासराव देशमुखानंतर मराठवाड्यातील काँगे्रसचा महत्वाचा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिले जात होते. ज्यांची संपूर्ण हयात काँगे्रसमध्ये गेली, ज्यांच्या वडिलांना काँगे्रसने मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, तेच अशोक चव्हाण आयुष्याच्या उत्तरार्धाच्या वेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत, या बाबी त्यांना देखील पटणार्‍या नाहीत. मात्र आदर्श घोटाळा, एका कारखान्यासाठी घेतलेले 200 कोटींचे कर्ज, याबाबी अंगलट येतांना दिसून येत असल्यामुळेच अशोक चव्हाणांनी भाजपची वाट धरली. खरंतर अशोक चव्हाण काँगे्रसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुमारे दीड-दोन वर्षांपूर्वीच सुरू होत्या. त्याचबरोबर ऑपरेशन लोटस अंतर्गत भाजपचे प्लॉन ए, प्लान बी, प्लॉन सी यापूर्वीच ठरलेले होते. त्यातील एकनाथ शिंदे शिवसेनेचे बहुसंख्य आमदार घेऊन बाहेर, पडतील. जर प्लॉन ए यशस्वी न झाल्यास अजित पवार बहुसंख्य आमदार घेऊन बाहेर पडतील आणि राज्यात सत्ता स्थापन करू, असा भाजपचा होरा होता. आणि शेवटचा पर्याय म्हणजे अशोक चव्हाण यांचा होता. आज भाजपचे तिन्ही प्लॉन यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शिंदे गट सत्तेत सहभागी झाला आहे, अजित पवार गटही सत्तेत असतांना आता अशोक चव्हाण यांनी तर थेट भाजपमध्येच उडी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सक्षम असे विरोधक राहणार नाही, याची भाजप काळजी घेतांना दिसून येत आहे. काही महिन्यापूर्वीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांना तुरूंगात टाकण्याची घोषणा केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी देखील आदर्शप्रकरणी ट्विट केले होते. असे असतांना देखील तेच अशोक चव्हाण आजमितीस भाजपला पवित्र होतांना दिसून येत आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची बक्षीसी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपकडे म्हणावे तशे हुशार नेते नसल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची हुशारी अणि इंग्रजी प्रश्‍न आल्यानंतर त्यांची उडणारी भंबेरी सर्वांनीच अनुभवली आहे. शिवाय लोकसभेत औकादीची भाषा देखील त्यांची समोर आली आहे. त्यामुळे केंद्रात आजही अनेक मंत्रीपदाची वाणवा आहे, मात्र त्या पदांना न्याय देणारे व्यक्ती भाजपकडे नसल्याचे अनेकवेळी समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, निर्मला सीतारामण, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासारखे मोजके चेहरे सोडले तर, भाजपकडे हुशार आणि अनुभवी व्यक्तींची वाणवा आहे. अशावेळी अशोक चव्हाणांना केंद्रात संधी देवून त्यांना मंत्रीपदाची संधी भाजप देवू शकते. त्याचबरोबर मराठवाडयात आणि विदर्भात त्यांना मानणारे अनेक आमदार आहेत. त्यामुळे काँगे्रसचे अनेक आमदार आत्ताजरी भाजपसोबत गेले नाही तरी, विधानसभेच्या तोंडावर ते भाजपमध्ये डेरेदाखल होऊ शकतात, त्यामुळे काँगे्रस देखील फुटू शकते. त्यामुळे काँगे्रसला मोठे डॅमेज कंट्रोल थांबवावे लागणार आहे. 

COMMENTS