Homeताज्या बातम्याक्रीडा

टी-20 विश्‍वचषकाचे सामने मोफत दिसणार

डिज्नी प्लस हॉटस्टारची मोठी घोषणा

मुंबई : जून 2024 मध्ये टी-20 विश्‍वचषक 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होणार असून 1 ते 29 दरम्यान या स्पर्

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर
आशिया चषकापूर्वी रोहितचं तिरूपती बालाजीला साकडं
लिबर्टी मंडळाचा दैदिप्यमान गौरवशाली इतिहास : गिरीष इरनाक याचे गौरवोद्गार

मुंबई : जून 2024 मध्ये टी-20 विश्‍वचषक 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे होणार असून 1 ते 29 दरम्यान या स्पर्धेतील सामने होणार आहेत. दरम्यान, आता या स्पर्धेला सुरु होण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना स्पर्धेचे अधिकृत प्रसारक डिज्नी प्लस हॉटस्टारने मोठी घोषणा केली आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने घोषित केले आहे की भारतातील स्मार्ट फोन युजर्सला आगामी टी-20 विश्‍वचषक त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत पाहाता येणार आहे. यापूर्वीही डिज्नी प्लस हॉटस्टारने अशी ऑफर एकदिवसीय विश्‍वचषक आणि आशिया चषकावेळी दिली होती. त्यामुळे त्यांना विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली होती. आता त्यांनी आगामी टी-20 विश्‍वचषकासाठीही हेच मॉडेल कायम केले आहे.

दरम्यान, जूनमध्ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषक सामने अमेरिकेतील तीन ठिकाणी आणि वेस्ट इंडिजमधील सहा ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तसेच हा विश्‍वचषक खास आहे, कारण यंदाच्या या जागतिक स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत. या 20 संघांचे पहिल्या फेरीसाठी 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका, वेस्ट इंडिज, ओमान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , बांगलादेश आणि नेदरलँड्स हे 20 संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघाचा समावेश अ गटात असून या गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होईल, तर 9 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. तिसरा सामना अमेरिकेविरुद्ध 12 जूनला होईल, तर चौथा सामना 15 जूनला कॅनडाविरुद्ध होईल. पहिल्या फेरीतील हे चारही सामने भारतीय संघ अमेरिकेत खेळणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान

COMMENTS