Homeताज्या बातम्यासंपादकीय

तापमानवाढीतील बदल

राज्यात दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हटली की, थंडीचा मौसम असतो. थंडीमध्ये सकाळी-सकाळी उठून उटणं अंगाला लावून अंघोळ करण्याची परंपरा. त्यामु

लाचखोरीपासून संरक्षण नाहीच
हकनाक बळी !
शिदेंच्या शिवसेनेवर नामुष्की

राज्यात दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळी म्हटली की, थंडीचा मौसम असतो. थंडीमध्ये सकाळी-सकाळी उठून उटणं अंगाला लावून अंघोळ करण्याची परंपरा. त्यामुळे बोचरी थंडी दिवाळीला असतेच असते. मात्र यंदा ऐन थंडीच्या दिवसांमध्ये एकीकडे प्रचंड असं तापमान वाढ आणि दुसरीकडे पाऊसाच्या धारा असा विरोधाभास दिसून येत आहे. पावसामुळं रब्बी पिके धोक्यात येतांना दिसून येत आहे. द्राक्षांवर देखील प्रचंड असा परिणाम होतांना दिसून येत आहे. मात्र मुळातच मुद्दा असा आहे की, वाढते प्रदूषण आणि तापमानवाढीमुळे निसर्गाचे चक्र बिघतांना दिसून येत आहे, परिणामी त्याचा मानवर आयुष्यावर गंभीर असा परिणाम होतांना दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता, मानवी आरोग्य धोक्यात येतांना दिसून येत आहे. मुंबईसारख्या शहरात वाढती धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. दुसरीकडे राजधानीत देखील वाढते प्रदूषण गंभीर समस्य बनतांना दिसून येत आहे. परिणामी राजधानीत शाळा बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. त्याचबरोबर आता दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात प्रदूषण रोखण्यासाठी आत्तपासूनच कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना आपल्याला सामौरे जावे लागणार आहे. त्यासाठी आतापासून उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. भारत हा देश केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच विविधतेने नटलेला नाही तर भौगोलिक व नैसर्गिक विविधतेनेही संपन्न आहे. पण या प्रत्येक बाबीचे काही गुण असतात तसे दोषही असतात. भारत हा मौसमी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तीनही ऋतुंचा हवामानाचा प्रभाव येथील वातावरणात निश्‍चितपणे पडलेला असतो. सध्या सुरु असलेल्या उन्हाळामुळे राज्यातच नव्हे तर देशभर तापमानवाढीची लाट आली आहे. देशभरातील अनेक जिल्ह्यात ऐन थंडीच्या मौसमात घामाच्या धारा वाहतांना दिसून येत आहे. तापमानवाढीची समस्या ही गंभीर समस्या असून, ती मानवी जीवनावर परिणाम करत असतांना दिसून येत आहे. तापमानवाढ ही ऋतुचक्र आणि हवामानावर परिणाम करतांना दिसून येते. त्यामुळेच अति पाऊस, ढगफुटी, वादळे, महापूर, थंडी, आणि उष्णतेची लाट, रोगराई, अशा अनेक नैसर्गिक संकटांना आज अनेक देशांना सामना करावा लागत आहे. पर्यावरणाचा र्‍हास झाल्यामुळे उष्णतेत वाढ, कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ अशा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठीच शाश्‍वत विकासाची संकल्पना पुढे आली. देशाचा राज्याचा विकास साधत असतांना पर्यावरणपुरक विकास साधणे गरजेचे आहे. मात्र याकडे डोळेझाक करणे चालू आहे, परिणामी यामुळे सर्वसामान्यांना व्यक्तींना जेव्हा आपल्या रोजीरोटीसाठी बाहेर पडावे लागते तेव्हाच अशा व्यक्ती उष्माच्या बळी पडून आपला जीव गमावतात. पर्यावरणाकडे सातत्याने दूर्लक्ष केल्यामुळे, झाडांच्या कत्तली अलिकडच्या काळात मोठया प्रमाणावर होत आहे. शहरांमध्ये तर झाडांची संख्या घटल्याने तापमान मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच वाढत्या तापमानाबरोबरच अतिनील किरणांचाही मोठा त्रास भोगावा लागत आहे. या किरणांचे प्रमाण सध्या प्रमाणापेक्षा अधिक आढळले आहे. औद्योगीकरणाद्वारे करोडो रूपये कमावणारे, विकासाच्या नावाखाली पर्यावरणासाठी खेळणारे, यांना या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणावा तसा जाणवत नाही, कारण आरामदायी ऑफिसमध्ये एसीच्या थंडगार वातावरणामध्ये राहणार्यांना मात्र त्याची झळ जाणवत नाही त्याचा फटका मात्र सर्वसामान्यांनाच बसतो, आणि त्याचे पर्यावसान त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

COMMENTS