Homeताज्या बातम्यासंपादकीय

 बदल चिंताजनक

भारतासारख्या देशाला सध्या हवामान बदल प्रामुख्याने भेडसावतांना दिसून येत आहे. खरंतर भारतात विविध प्रकारचे हवामान आहे. एकीकडे प्रचंड थंडी, तर दुसरी

तपास यंत्रणा कुणाच्या इशार्‍यावर काम करतात ?
नोटबंदीचा संशयकल्लोळ
परदेशी विद्यापीठांसाठी भारतीय बाजारपेठ खुली

भारतासारख्या देशाला सध्या हवामान बदल प्रामुख्याने भेडसावतांना दिसून येत आहे. खरंतर भारतात विविध प्रकारचे हवामान आहे. एकीकडे प्रचंड थंडी, तर दुसरीकडे प्रचंड उकाडा होणारे प्रदेश आपल्या देशात आहे. विभन्न परिस्थिती असलेल्या या देशामध्ये सध्या हवामन बदलाचा तडाखा सहन करावा लागतांना दिसून येत आहे. नुकतेच येऊन गेलेले मिचाँग  दक्षिणेतील तमिळनाडू, आंधप्रदेश राज्याला मोठी किंमत मोजावी लागली. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना आलेले नदीचे स्वरूप, रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान यामुळे शेतकर्‍यांसोबतच सर्वसामान्यांचे नुकसान देखील झाले.
हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीचा भारताला मोठा फटका बसला असून 2011-2020 या दशकात अतिवृष्टी, अतिउष्णता अनुभवण्यास मिळाली, असे निरीक्षण जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) प्रसिद्ध  ताज्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामानासंबंधी परिषदेत हा अहवाल जाहीर करण्यात आला. ‘हवामानाची दशकभरातील स्थिती 2011-2020’ या अहवालात आणखी अनेक बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच, गेल्या आठवड्यामध्ये हवामान बदल परिषदेत सन 2023 चा हंगामी वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार आगामी वर्ष सर्वाधिक उष्ण ठरेल, असा अंदाज  अहवालात व्यक्त करण्यात आला. त्यामुळे भारतासाठी अनेक धोक्याचे इशारे यानिमित्ताने देण्यात आलेले आहे. त्यामुळे हवामान बदल गांभीर्याने घेण्याची खरी गरज आहे. पृथ्वीच्या तापमानवाढीत मानवी हस्तक्षेपाचा नि:संशय हातभार आहे. 1850 पासून औद्योगिक उत्क्रांतीच्या काळापासून ते आत्तापर्यंत कोळसा व क्रूड तेल जाळण्यामुळं जो कार्बन डाय ऑक्साइड ( उड2) वायू मुक्त होतो  आणि त्याची पातळी आता निसर्गाच्या हा वायू शोषून घेण्याच्या मर्यादेपलीकडे गेली आहे. (मागच्या दशकात जगानं 58 गेगाटन इतका  कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडला!) मांस व दुग्धजन्य पदार्थाच्या गरजा भागवण्यासाठी तयार केलेले जनावरांचे अजस्र कारखाने मिथेन वायू हवेत सोडतात. शिवाय जनावरांच्या खाण्यासाठी लागणार्‍या सोयाबीनच्या पिकासाठी हजारो हेक्टर जंगलं उद्ध्वस्त केली  आहेत. अ‍ॅमेझॉन, ज्याला आपण कधीकाळी पृथ्वीची फुप्फुसं म्हणत होतो, त्या जंगलाला जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमुळं ते आता कार्बन डाय ऑक्साइड शोषण्याऐवजी तोच बाहेर ओकत आहे. वाढते प्रदूषण, हवमध्ये होणारे बदल याकडे आपण अजूनही गांभीर्याने बघतांना दिसून येत नाही.  पृथ्वीचे सरासरी तापमान आत्ताच एक सेल्सियस वाढलेले आहे. तापमानवाढीमुळे दरवर्षी उष्णतेच्या लाटांना  द्यावे लागणे यापेक्षा ही समस्या खूपच अजस्र आहे. ध्रुवांवरचा आणि ग्रीनलंडवरचा बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे चालू आहे, त्यामुळे समुद्रकिनार्‍यावरची हजारो गावे पाण्यात बुडून लाखो लोक बेघर (क्लायमेट रेफ्युजी) होत आहेत. महासागरांतील शीत व उष्ण अंतप्र्रवाहाच्या व वार्‍यांच्या दिशा बदलल्यामुळे उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटा, वादळांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.  राज्यातच अल निनोच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवसानंतर कडाक्याची थंडी पडेल असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे हवामान बदल, पावसाचे बदललेले प्रमाण आणि अनिश्‍चितता, ढगफुटी यामुळे मोठया प्रमाणावर येणारे पूर ही बदललेल्या हवामानाची झलक आहे. साधन-संपत्तीचा र्‍हास, पिकांचे नुकसान आणि अन्नधान्याची उपलब्धता कमी होत जाणे अशी लांबलचक समस्यांची जंत्री म्हणजे हवामान  समस्या. हवामान बदलाला संपूर्ण मानवजातच दोषी असून, मानवाने बदल करणे गरजेचे आहे. मात्र अवाढव्य लोकसंख्येसाठी लागणार्‍या साधनसामुग्री, अन्न, धान्य या सर्वच बाबींसाठी रायायनिक बाबींचा अतिरेक करण्यात येतो. त्यामुळे तापमान मोठया प्रमाणावर वाढतांना दिसून येत आहे. त्यामुळे तापमान वाढ रोखण्याचे सर्वच देशासमोर मोठे आव्हान आहे. मात्र प्रगतीचा आलेख चढता ठेवण्याच्या  सातत्याने प्रदूषणात मोठी वाढ होतांना दिसून येत आहे. हवामान बदलामुळे कृषी उत्पादकता खालावते, पायाभूत सोयीसुविधांवर ताण पडतो आणि सार्वजनिक आरोग्य बिघडून जाते. त्यातून रोगराईचा धोका वाढतो आणि एकूणच उत्पादकतेवर परिणाम होतो. हवामान बदलाचा आर्थिक दुष्परिणामही अनेक आहेत. गरिबी वाढते, गुंतवणुकीचा वेग मंदावतो आणि एकंदर आर्थिक विकास व उत्पादकतेवर परिणाम  त्यामुळे हवामान होणारे बदल ओळखून, मानवाने आपल्या जीवनशैलीत बदल करण्यासोबतच भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे संवर्धन करावे लागणार आहे.  

COMMENTS