Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

मुंबई - अपना सपना मनी मनी’, ‘योद्धा’, ‘क्या कूल है हम’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालं

अतिधोकादायक इमारतींची वीज, पाणी करणार खंडित
टीम इंडियाचा रवी बिश्नोई बनला अव्वल T20 गोलंदाज
भिंगाणगाव चार दिवसांपासून अंधारात

मुंबई – अपना सपना मनी मनी’, ‘योद्धा’, ‘क्या कूल है हम’ या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन झालं आहे. ८ मे ( बुधवार ) रोजी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिवन यांच्या निधनावर सिनेविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ते बॉलीवूड स्टार्स सनी देओल, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे यांनी सिवन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दिग्दर्शकाच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संगीत सिवन यांचे धाकटे बंधू व राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमेटोग्राफर संतोष सिवन यांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी सर्वांना दिली. याशिवाय रितेश देशमुखने सुद्धा एक्स पोस्ट शेअर करत दिग्दर्शकाच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

COMMENTS