Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी गावांमध्ये पर्यायी व्यवस्था उभी करावी- सीईओ आशिमा मित्तल

पाणी टंचाई व चारा टंचाई बैठकीत गट विकास अधिकार्‍यांना सूचना

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज सर्व तालुक्

सख्या भावाचा व काकाचा खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा | LOKNews24
तुळशीच्या पानांचा रोगांवर उपाय
एकापाठोपाठ 3 मुलींनी घेतली धावत्या ट्रेनमधून उडी | LOK News 24

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, पशुधन विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. या बैठकीत भीषण पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची तातडीने बैठक घेऊन सद्यस्थितीत असलेली पाणीटंचाई व संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या.

त्याचबरोबर दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणाऱ्या गावांची पाहणी करून या गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी पर्यायी व्यवस्था कशी करता येईल याबाबत लक्ष द्यावे, संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात यावे अशा सूचना यावेळी दिल्या. ज्या गावांनी टँकरची मागणी केलेली आहे त्या गावांच्या टँकर मागणीच्या प्रस्तावांबाबत त्वरित पाठपुरावा करून गावांमध्ये टँकर तात्काळ सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत ज्या योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहे ती कामे तात्काळ पूर्ण करावी असेही यावेळी त्यांनी सांगितले. दि. 7 मे च्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत 296 गावातील 757 वाड्या-वस्त्यांवर *326 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.* त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात 169 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

चारा टंचाईबाबत आढावा घेताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नाशिक तालुक्यात मे महिन्याअखेर पुरेल इतका चारासाठा उपलब्ध आहे त्यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये चारा उपलब्धतेबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांना तालुका भेट देऊन बैठक घेण्याच्या सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अबोली सताळकर यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता, तालुका  पशुधन विकास उपस्थित होते.

COMMENTS