Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रश्न मार्गी लागणार : वाकचौरे

कोपरगाव : शहरातील लक्ष्मीनगरसह विविध भागांतील शासकीय जागांवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्यांच्या नावाचे उता

बाळासाहेब ठाकरे जन्म शताब्दीनिमित्त विविध उपक्रम : हाडा
कुकडीच्या लिंक कॅनॉलवरील पाणी वाटपावरून वाद; अन्यायकारक वितरणाविरोधात पाणी वापर संस्थांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा
प्रादेशिक नळ पाणीपुरवठाचे कर्मचारी उद्यापासून संपावर ;कंत्राटी कामगार संघटनेचा इशारा; वेतन व सुविधांअभावी आंदोलनाचा निर्णय

कोपरगाव : शहरातील लक्ष्मीनगरसह विविध भागांतील शासकीय जागांवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून तेथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्यांच्या नावाचे उतारे मिळावेत, यासाठी आ. आशुतोष काळे गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या प्रयत्नांतून लक्ष्मीनगरसह शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका माधवी वाकचौरे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील लक्ष्मीनगर परिसरात अनेक वर्षांपासून नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास आहेत. या जागा नियमानुसार नियमित करून संबंधित नागरिकांना त्यांच्या नावाचे उतारे मिळावेत, हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सन २०१९ पासून आमदार आशुतोष काळे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक हालचाली सुरू केल्या.
त्यांच्या सूचनेनुसार लक्ष्मीनगर परिसरातील शासकीय जागांवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून आवश्यक कागदपत्रे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावीत आणि संबंधित नागरिकांना उतारे मिळवून द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी २९ नोव्हेंबर २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती.
त्यानंतर ५ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार काळे यांनी लक्ष्मीनगरमधील शासकीय जागांवरील वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागा शासन नियमांनुसार नियमित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच शासकीय जागेवरील नागरिकांना त्यांच्या जागांचे उतारे लवकर मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही दिले होते. या बैठकीत शहरातील इतर भागांतील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतही चर्चा झाली होती.
लक्ष्मीनगरप्रमाणेच टाकळी नाका, साईनाथ नगर, सुभाषनगर भाग-१ व २, संजयनगर भाग-१ व २, टिळकनगर, गोरोबा नगर, गजानन नगर, महादेव नगर भाग-१ व २, लिंभारा मैदान, जिजामाता उद्यान, खडकी, गांधीनगर भाग-१ व २, दत्तनगर, बेट परिसरातील २० कुटुंबे तसेच हनुमान नगर या भागांतील अनेक कुटुंबे गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागांवर वास्तव्यास आहेत. या सर्वांची अतिक्रमणे लवकरात लवकर नियमानुकूल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे माधवी वाकचौरे यांनी सांगितले.

COMMENTS