पुणे : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ४० अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. शहरात गुरुवारी दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि पश्चिम तसेच पूर्व भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुण्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागात पावसानं हजेरी लावली आहे.
पुणे शहरातील उपनगर तसेच मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पुणे शहरात पावसाची शक्यता आहे. पुणे शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं, अखेर दुपारी पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यातील भोर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस झाल्याीच माहिती आहे. पुणे शहरातील केशवनगर, मुंढवा, खराडी परिसरात दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. तसेच औंध, बाणेर, बालेवाडी, सांगवी, शिवाजीनगर या भागात ४ वाजता विजेच्या कडकडासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. याशिवाय वडाचीवाडी, पिसोळी, हांडेवाडी, होकारवाडी या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे निश्चित काही पुणेकरांची तारांबळ उडाली असली तरी सुद्धा उकाडापासून पुणेकरांना नक्कीच या पावसाने दिलासा दिला आहे. पुण्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळं कोंढव्यातील ज्योती चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. काही वाहनचालक पाण्यातून वाट काढत वाहने घेऊन जाताना पाहायला मिळाले.
पिंपरी चिंचवडमध्ये दुपारच्या चार वाजताचं अंधारमय वातावरण झालंय ढग दाटून आल्यानं अंधार पडल्याचं पाहायला मिळालं. आणि तुफान पाऊस ही कोसळतोय. उकाड्याने हैराण झालेले शहरवासीय याचं पावसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर आज ही प्रतीक्षा संपली आहे. पिंपरीत तापमान 40 अशांच्या वर जात असल्यानं पाऊस पडून गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडकरांनी केली होती.
गेल्या दोन दिवसांपासून भरदुपारी ढग दाटून येत होते, मात्र पाऊस हुलकावणी देत होता. आज मात्र ढग इतके दाटून आले की अंधारमय वातावरण ही झालं आणि तुफान पाऊस ही कोसळला. यामुळं शहरवासीयांना ताटकळत उभं रहावं लागलं. पावसानं तुफान हजेरी लावल्यानं काही नागरिक पावसात अडकल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, पुणे पिंपरी चिंचवडसह सातरा जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात हलक्या सरीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित मराठवाड्यात कोरड्या हवामानाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

COMMENTS