Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर खंडाळा येथील आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद

श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालय, डॉ. बाळासाहेब विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना

आता कर्जत-जामखेडमध्ये लक्ष घालून परिवर्तन करणार : माजी खा. विखे; चौंडी येथे ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे उत्साहात स्वागत 
अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी
शिरसाटवाडीतील विकास कामांची शासकीय समितीकडून पाहणी
श्रीरामपूर ग्रामीण रूग्णालय देशात पहिले, कायाकल्प पुरस्कार पटकावला


श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालय, डॉ. बाळासाहेब विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि अनुलोम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोगनिदान व उपचार शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ४६० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २५ रुग्णांना पुढील उपचारासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी  विखे पाटील बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  निशाताई निर्मळ होत्या. यावेळी  विखे पाटील यांनी गरजू रुग्णांनी अशा शिबिरांचा लाभ घेऊन व्याधीमुक्त व्हावे, असे आवाहन केले.
त्या पुढे म्हणाल्या की, तरुण शेतकऱ्यांनी रसायनमुक्त शेतीकडे वळावे. भाजीपाला पिकांसाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर करणे गरजेचे आहे. कोरोना काळात वापरलेल्या काही औषधांमुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच रासायनिक घटकांच्या अति वापरामुळे कर्करोगाचे प्रमाणही वाढत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली.
   यावेळी माजी सरपंच भागवतराव ढोकचौळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात  शालिनी  विखे पाटील यांचा सत्कार प्रमिला गोरक्षनाथ सदाफळ व शारदा  ढोकचौळे यांनी केला. तसेच अध्यक्ष निशाताई निर्मळ यांचा सत्कार सरपंच छाया बर्डे व उपसरपंच भारती वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.  
शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोरक्षनाथ सदाफळ, चंद्रशेखर ढोकचौळे, रामचंद्र त्रिभुवन, योगेश वैद्य, सुरेश पवार, सुरेश विघावे, महेश मरकडे, दिनकर सदाफळ, विनोद पवार, सुरेश मुंढे, शिवाजी घोरपडे, अक्षय खैरनार, खंडेराव सदाफळ आदींनी परिश्रम घेतले. अनुलोम मित्र दीपक खरात यांनी शिस्तबद्ध नियोजन केले.  

COMMENTS