Homeताज्या बातम्या

अनुकूल काळात प्रतिकूलतेचा विसर पडल्यास अहंकार वाढतो; माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे प्रतिपादन

कोपरगाव : येवला तालुक्यातील पिंपळगाव जळाल येथे शिवबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचवा साहित्य कलाकृती पुरस

बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती
NEET प्रश्नपत्रिका गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघांना अटक; एक डॉक्टर तर दुसरा प्राध्यापक, आतापर्यंत १३ आरोपी ताब्यात
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम

कोपरगाव : येवला तालुक्यातील पिंपळगाव जळाल येथे शिवबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचवा साहित्य कलाकृती पुरस्कार’ वितरण सोहळा गुरुवारी (दि. ४) संपन्न झाला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते राज्याच्या विविध भागांतील कवी, लेखक आणि गझलकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी, “अनुकूल काळात प्रतिकूल काळाचा विसर पडल्यास माणसाचा अहंकार वाढतो,” असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन केले.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, “स्व. शहादू वाघ यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत साहित्याची आवड जोपासली. ग्रामीण भागात साहित्यिक चळवळीला चालना देणारा वाघ परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. माणसातील माणूसपण जपण्याचे कार्य साहित्य करते. सध्याच्या डिजिटल युगात विज्ञान-तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना समाजाने त्याच्या आहारी जाऊ नये.”

कार्यक्रमात प्रास्ताविक करताना प्रशांत वाघ यांनी, “आमची कर्मभूमी कोपरगाव येथील संजीवनी उद्योग समूह असून, या संस्थेकडून मिळालेले संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपतच आम्ही हे कार्य करत आहोत,” असे सांगितले. या सोहळ्याला प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका अंजनाबाई वाघ, अध्यक्ष संजय वाघ, सचिव राजेश वाघ, डॉ. नंदकुमार राऊत, प्रा. दादासाहेब कोते यांच्यासह साहित्यिक व पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS