Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरिजितसिंग चव्हाण खून प्रकरण : साईलाला व इंगळे यांना चार दिवसांची पोलीस कोठडी

नांदेड : शहरातील गाजलेल्या अरिजितसिंग उर्फ प्रफुल्ल गजानन चव्हाण खून प्रकरणात पोलिस तपासाला वेग आला असून, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी साईसिंग उर्

जन्म दाखल्यासाठी ३ हजारांची लाच; जामखेड नगरपरिषदमधील घटना; दोघांना तीन दिवसांची कोठडी
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
संशयित दानिश शेखच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक

नांदेड : शहरातील गाजलेल्या अरिजितसिंग उर्फ प्रफुल्ल गजानन चव्हाण खून प्रकरणात पोलिस तपासाला वेग आला असून, या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी साईसिंग उर्फ साईलाला दीपकसिंग गहेरवार (वय 26) आणि नितेश परमेश्वर इंगळे (वय 22) यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांना 28 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस ताब्यात ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत.
दि. 4 एप्रिल 2026 रोजी शहरातील डी-मार्ट परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तीव्र हाणामारीत अरिजितसिंग चव्हाण याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीत दुसर्‍या गटातील सय्यद आवेज सय्यद खलील (27) आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) यांचाही मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, मृत्यू पावलेले हे दोघेही गुन्हा क्रमांक 172/2026 मध्ये आरोपी म्हणून नोंदविण्यात आले आहेत. या खून प्रकरणात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान आणखी काही संशयित आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यापूर्वी जयकुमार उर्फ सोनू कैलास राऊत (23) आणि शाकेर खान रशीद खान (30) यांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दिग्विजय गणेशराव नारगुडे (22) आणि मन्मथ वसंतराव मंगरुळे (25) यांनाही अटक करण्यात आली. पुढे शेख शाहरुख उर्फ कबूर शेख अजगर (29) आणि शेख उबेद शेख अजगर (23) यांनाही पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांची पोलीस कोठडी 25 एप्रिलपर्यंत आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी साईलाला आणि नितेश इंगळे यांना वाराणसी येथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक महेश माळी आणि त्यांच्या पथकाने त्यांना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. शेख सादिक यांनी तपासाची दिशा स्पष्ट करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या कटकारस्थानाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाचे अ‍ॅड. जयकुमार ढवळे यांनी या मागणीला विरोध दर्शविला. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या नोंदींनुसार, इलियास उर्फ काला इल्लू तसेच साईलालाच्या टोळीतील इतर काही साथीदार अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू असून, येत्या काळात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची तसेच अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS