Homeताज्या बातम्याशहरं

राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे

बहुजन समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली संवाद यात्रा राज्यातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहे. यावेळी जनतेशी होणार्‍या संवादातून महाविकास आघाडी सरकार

जलयुक्तच्या कारवाईला चौकशी अहवालाची प्रतीक्षा
Ahmednagar : नेहरू मार्केटला भीषण आग | Loknews24
वाघोली ते शिरूर होणार दुमजली उड्डाणपूल… तळेगाव – अहमदनगर रस्त्यासाठी ५० हजार कोटींची तरतूद

बहुजन समाज पक्षाच्यावतीने काढण्यात आलेली संवाद यात्रा राज्यातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत आहे. यावेळी जनतेशी होणार्‍या संवादातून महाविकास आघाडी सरकारविरोधातील नाराजी जनता जाहीर प्रकट करीत आहे, असा दावा बसपचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजणे यांनी येथे केला. म्हणून सर्वसमावेशक आणि सर्व हितकारक पक्ष केवळ बसपाच आहे. अशात सर्वजण सुख-सर्वजण हित आणि समाजकारण या त्रिसूत्रीवर बसपा आगामी निवडणुका लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सर्जेपुरा येथे रहेमत सुलतान सभागृहात यानिमित्ताने जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राज्य प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश सचिव पंडित बोर्डे, वरिष्ठ नेते मुकुंद सोनोवणे, जिल्हा सचिव बाळासाहेब आव्हारे, संजय डहाणे, सुनील ओहळ, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष जितू साठे, सुनील मगर, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण काकणे, सचिव बाळासाहेब मधे उपस्थित होते.

पुढे बोलताना अ‍ॅड. ताजणे म्हणाले की, सरकारकडून काढण्यात येणार्‍या अध्यादेशानंतर ओबीसींचे आरक्षण 27 टक्क्याहून कमी राहील. यात पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार मध्ये 15 टक्के, यवतमाळ 17 टक्के, गडचिरोली 17 टक्के, चंद्रपूर 19 टक्के, रायगड 19 तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये 27 टक्के आरक्षण मिळेल. त्यामुळे महाविकास आघाडीचे हे कृत्य ओबीसी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्य प्रभारी रैना म्हणाले की, प्रमुख नेत्यांच्या प्रवेशाने बसपाला बळ मिळाले आहे. संवाद यात्रेदरम्यान विविध जिल्ह्यांमधील प्रमुख नेते बहन मायावतीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होवून बसपात प्रवेश करीत आहे. या नेत्यांनी पक्षावर दाखवलेल्या विश्‍वासाने पक्षसंघटना अधिक बळकट होणार आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने पक्ष विस्ताराच्या कामाला लागण्याचे त्यांनी आवाहन केले.

या मेळाव्यात माजी सनदी अधिकारी सुनील शेजवळ यांनी बसपात प्रवेश केला. यावेळी शेवगावचे प्रवीण मगर, पद्माकर चव्हाण, धनंजय दिंडोरे, सुनील देठे, बाळासाहेब श्रीराम, सुलेमान शेख, अजित भोसले यांनी बसपात प्रवेश केला.

COMMENTS