Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

18 तास अभ्यास उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी आदरांजली

मुदखेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरातील भीमनगर येथील सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या वतीने 18 तासांच्या

श्रीरामपुरात डॉ. आंबडेकरांचा भव्य पुतळा उभारणार; माजी खा. डॉ. सुजय विखे ;  ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित
ऐतिहासिक उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी; सेवाभावी तंत्रज्ञ गजानन मुंडे यांचा भव्य सत्कार
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे

मुदखेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरातील भीमनगर येथील सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या वतीने 18 तासांच्या अभ्यास उपक्रमातून त्यांना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.
दि. 24 एप्रिल 2026 रोजी नगरपरिषद मुदखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भंते गगनबोधी (बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र, मुदखेड) व सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर. कांबळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक अविनाश चौदंते, ड. अमोल भुरे, न.प. ग्रंथपाल रमेश सावंत, अमोल चौदंते, परीक्षक उपा. डी.जी. चौदंते, संजय डोंगरे, बालकृष्ण चौदंते, शंकर लोकडे, सुचिताताई गोवंदे व त्रिशलाताई आठवले आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात एकूण 32 वाचकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सहभागी विद्यार्थी आणि नागरिकांनी विविध विषयांवरील पुस्तके वाचून ज्ञानार्जन केले. समाजात वाचन संस्कृतीला चालना देणे, अभ्यासाची सवय रुजवणे आणि युवकांमध्ये विचारप्रवर्तक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. बाबासाहेबांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राचा प्रत्यय या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदंते, उपाध्यक्ष अमोल सरोदे, कोषाध्यक्ष संतोष चौदंते, सचिव अमोल चौदंते, सहसचिव सोनू चौदंते, सल्लागार गजू चौदंते यांच्यासह सर्व सदस्य व तरुण कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

COMMENTS