Homeताज्या बातम्या

एसएसजीएम महाविद्यालयाच्या विविध प्रस्तावांना मंजुरी

कोपरगाव : येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीचे नवनियुक्त अध्यक्ष ऍड. संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत व

एफ ग्रेडमधून 22 महाविद्यालयांना दिलासा; अवघ्या 15 दिवसांत नेमके बदलले काय?
बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध
बीड येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा 81 वा वर्धापन दिन उत्साहात  साजरामहामानव अभिवादन ग्रुप वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे पी.ई.एस. च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


कोपरगाव : येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीचे नवनियुक्त अध्यक्ष ऍड. संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वाचा घटक असलेल्या क्रीडा क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी विविध विकासात्मक निर्णय घेण्यात आले.
 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयातील क्रीडा सुविधांच्या उन्नतीसाठी विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बैठकीत मंजूर करण्यात आलेले हे विषय पुढील कार्यवाही व अंतिम मान्यतेसाठी संस्थेकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये बास्केटबॉल मैदानाच्या नूतनीकरणासह कबड्डी, कुस्ती, ज्युडो आदी खेळांसाठी आधुनिक आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, रनिंग ट्रॅकचे आधुनिकीकरण करणे.
जंपिंग पिटची दुरुस्ती, जिमखाना हॉलची देखभाल व दुरुस्ती तसेच मल्टी-जिम उपकरणांचे अद्ययावतीकरण या कामांचाही विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि स्पर्धात्मक क्रीडा वातावरण उपलब्ध होणार आहे.
 महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच पायाभूत सुविधा व क्रीडा विकासालाही समान प्राधान्य देण्याची भूमिका संस्थेची असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. बैठकीस महाविद्यालय विकास समितीचे सचिव प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सदस्य  सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, महेंद्रशेठ काले, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. माधव यशवंत, डॉ. देविदास रणधीर, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. निलेश मालपुरे तसेच कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी उपस्थित होते.

COMMENTS