Homeताज्या बातम्या

जगदंबा विद्यालयात योग दिन उत्साहात

अहिल्यानगर : भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या जगदंबा विद्यालय, केडगाव येथे शनिवारी (दि. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्या

युवान आयोजित प्रेरणा कार्यक्रमात यु.पी.एस.सी. मधील गुणवंतांचा गौरव
विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागात नियुक्ती
भाकप फुंकणार जातनिहाय जनगणनेचे रणशिंग


अहिल्यानगर : भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या जगदंबा विद्यालय, केडगाव येथे शनिवारी (दि. २१) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
योगप्रशिक्षक शरद मंडलिक यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. तसेच योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते, याविषयी मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक जयसिंग दरेकर यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास अशोक हराळ, आबासाहेब नेहूल, रूपा सवाईमूल, सविता कांबळे, अमित अवधूत आणि कैलास पवार यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग दिन उत्साहात साजरा केला.

COMMENTS