कोपरगाव : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या ऊर्जेचे केंद्र असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ३५ लाख रुपय

कोपरगाव : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या ऊर्जेचे केंद्र असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांचे आभार व्यक्त करण्यात आले.याच पार्श्वभूमीवर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हे केवळ एक उद्यान नसून शहरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालकांसाठी विरंगुळा, आरोग्य व सामाजिक संवादाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या उद्यानाचे सुशोभीकरण झाल्यानंतर नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून उद्यानाचा परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनणार आहे. माजी आ. स्नेहलता कोल्हे व आ. विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रसाद आढाव व सोनल अजमेरे यांनी प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांना दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
उद्यानातील पायाभूत सुविधा, हिरवळ, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था तसेच सौंदर्यवृद्धीसाठी आवश्यक विविध कामांना या निधीमुळे गती मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक ठिकाणांच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्ष पराग संधान यांनी उद्यानाच्या विकासासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. यावेळी,
प्रसाद आढाव, सोनल अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, संजय जगदाळे, श्रीकांत राठी, दत्तोबा जोर्वेकर, राहुल अजमेरे, शितल अजमेरे, परेश आढाव, सलीम अत्तार, राकेश काले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS