राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी   भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे भारतातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची वार्षिक परिषद नुकतीच पार पडली. नव

कृषि विद्यापीठाचे कुलगुरु पाटील गोपालकाच्या भेटीला
ज्वारी सुधार प्रकल्पाचे कार्य उल्लेखनीय : कुलगुरु डॉ.पाटील
शेतक-यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा : कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  

भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे भारतातील कृषि विद्यापीठांच्या कुलगुरुंची वार्षिक परिषद नुकतीच पार पडली. नवी दिल्ली येथील ए.पी. शिंदे परिसंवाद हॉलमध्ये झालेल्या या  वार्षिक परिषदेत भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक व कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे सचिव डॉ. टी. महापात्रा यांच्या शुभहस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. 

यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, आर.पी.सी.ए.यु., पुसा येथील कुलगुरु डॉ. आर.सी. श्रीवास्तव व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे कृषि शिक्षण विभागाचे उपमहासंचालक डॉ. आर.सी. अग्रवाल उपस्थित होते. 

यामध्ये पहिले पुस्तक, महात्मा फुले कृषि विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या हरभरा, ऊस व डाळिंब या पिकांचे मुल्यांकन परिणाम लेखक डॉ. व्ही.जी. पोखरकर, डॉ. डी.बी. यादव, श्री. सी.एम. गुळवे आणि डॉ. डी.जे. सानप, दुसरे पुस्तक हवामान स्मार्ट डिजीटल शेती गाव ः महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा पुढाकार लेखक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. प्रभात कुमार, डॉ. एम.जी. शिंदे, डॉ. आर.पी. आंधळे, डॉ. ए.ए. अत्रे आणि डॉ. एस.ए. कदम आणि तिसरे पुस्तक डिजीटल कृषि तंत्रज्ञान ः कृषि व्यवस्थापन प्रणालीची योग्य वेळ लेखक डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. एस.ए. कदम, डॉ. सुधीर दहिवाळकर, डॉ. एम.जी. शिंदे, डॉ. पी.जी. पोपळे व डॉ. प्रभात कुमार या तीन पुस्तकांचे विमोचन या कार्यक्रमात करण्यात आले. 

या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी केंद्रिय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र सिंह तोमर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी शेतकरी कल्याण व कृषि राज्यमंत्री श्री. कैलाश चौधरी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सचिव व कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे अतिरीक्त सचिव श्री. संजय गर्ग उपस्थित होते. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी सदरील पुस्तकांच्या सर्व लेखकांचे अभिनंदन केले.

COMMENTS