अकोले : तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या मॉडर्न हायस्कूलच्या चेअरमन पदी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांची तर ज्ञानवर्धिनी बाल

अकोले : तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या मॉडर्न हायस्कूलच्या चेअरमन पदी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांची तर ज्ञानवर्धिनी बालक मंदिर या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ पत्रकार अमोल वैद्य यांची एकमताने निवड करण्यात आली. हिंद सेवा मंडळ संचलीत अकोले विभागाच्या प्रशासकीय अधिकारी पदी सेवानिवृत्त प्राचार्य संतोष कचरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.प्रतिमा कुलकर्णी यांचे शिक्षण एमएबीएड झाले असून यांनी शिक्षक म्हणून काम केले आहे.बाल आनंदवाडी ही प्रयोगशील बालवाडी अनेक वर्षे चालवली आहे. अमोल वैद्य यांचे शिक्षण एम.ए.बी.एड. व डिप्लोमा जर्नालिझम झाले असून सध्या ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच सुगाव खुर्द गावचे माजी सरपंच,महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आदींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची दखल घेत संस्थेने त्यांच्यावर चेअरमनपदाची जबाबदारी सोपविली आहे. तर सेवा निवृत्त प्राचार्य संतोष कचरे हे जनजाती कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या या निवडी बद्दल हिंद सेवा मंडळाचे मानत सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, संचालक दिलीपकुमार शहा, सचिव सहाय्यक योगेश देशमुख, मॉडर्न ज्युनियर कॉलेजचे चेअरमन, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांसह मंडळाचे सर्व पदाधिकारी व स्थानिक शाळा समिती सदस्य, पालक व विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS