Homeताज्या बातम्या

हिंदू खाटीक समाजासाठी कर्ज व अनुदान योजनांसाठी अर्ज मागविले; नांदेड जिल्हा कार्यालयाचे आवाहन

नांदेड: हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, नांदेड जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक

काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात
नांदेडमधील स्कूलबस किती सुरक्षित? विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ तर सुरू नाही ना?
“आमचा एकही आमदार फुटणार नाही!” – खासदार शरद पवारांचा बारामतीत ठाम विश्वास
अनुदान (Subsidy) – मराठी विश्वकोश

नांदेड: हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, नांदेड जिल्हा कार्यालयामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जातीतील हिंदू खाटीक समाजाच्या लाभार्थ्यांसाठी विविध कर्ज व अनुदान योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांकडून अधिकृत अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळामार्फत विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जात असून, यामध्ये प्रामुख्याने अनुदान योजना, बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, एनएसएफडीसी टर्म लोन, सूक्ष्म पतपुरवठा तसेच उच्च शिक्षण कर्ज योजनांचा समावेश आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे:

  • जात व उत्पन्नाचा दाखला
  • आधारकार्ड, पॅनकार्ड आणि रेशनकार्ड
  • मतदान ओळखपत्र आणि रहिवासी प्रमाणपत्र
  • व्यवसायाचे अधिकृत कोटेशन
  • बँक पासबुकची प्रत
  • शैक्षणिक कागदपत्रे व व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी ‘महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक, ज्ञानमाता शाळेसमोर, नांदेड’ येथे थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

COMMENTS