Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर खाजगी क्लासेससाठी आदेश निर्गमित; सकाळ-सायंकाळ सत्र किंवा ऑनलाईन माध्यमातूनच वर्ग घेण्याचे निर्देश

नांदेड : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क झाले

पटना येथे खान सरांच्या कोचिंग क्लासमध्ये लागली भीषण आग, इमारतीमधील फायर सिस्टीममुळे टळला मोठा अनर्थ!
यश नगरीत विजेच्या खांब्याला अचानक आग; वाहनांचे नुकसान, नागरिकांत घबराट
मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची पहिली सर! ५ ते १० जून दरम्यान मान्सून धडकणार! । लोकमंथन News२४
Amarnath - नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले अभिजीत राऊत सहआयुक्त  जीएसटी नांदेड : सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राहुल ...

नांदेड : जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेल्या उष्मालाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क झाले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 30 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी क्लासेससाठी विशेष आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, सर्व खाजगी शिकवणी वर्गांनी सकाळी किंवा सायंकाळच्या सत्रातच प्रत्यक्ष वर्ग घ्यावेत किंवा पर्यायाने ऑनलाईन/डिजिटल माध्यमांचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 या कालावधीत कोणत्याही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या इशार्‍यांची दखल घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पुरेसे पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, तसेच आरोग्यविषयक सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच पालकांना देखील योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा आदेश 31 मे 2026 पर्यंत लागू राहणार असून, त्याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS