Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात; दोघांचा होरपळून मृत्यू

पाथर्डी :  ट्रॅक्टर-ट्रॉली आणि दुचाकीच्या या भीषण धडकेत टाकळी मानूर  येथील दोन तरुणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी

ड्रोन व चोरट्यांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे आवाहन
महावितरणचा मनमानी कारभार; अमोलक रिसर्च सेंटरच्या ‘देवराई गार्डन’मधील झाडांची विनापरवाना कत्तल!
अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे शेवगाव पोलिसांना निवेदन
ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक अन् दुचाकीने घेतला पेट; दोघांचा होरपळून मृत्यू! –  MahaTimes

पाथर्डी :  ट्रॅक्टर-ट्रॉली आणि दुचाकीच्या या भीषण धडकेत टाकळी मानूर  येथील दोन तरुणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर (अंबिकानगर) येथील रहिवासी असलेले इकबाल अत्तार (वय ३२) आणि शफिक शेख (वय ४०) हे दोघे मंगळवारी रात्री पाथर्डीहून आपल्या गावाकडे दुचाकीवरून निघाले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मानूर येथील दहिफळे वस्ती परिसरात, ‘समाधान हॉटेल’ समोर त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टर-ट्रॉलीशी अत्यंत जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन गाडीने अचानक मोठा पेट घेतला.
 मदतीसाठी धावले नागरिक, पण घात झाला!आगीच्या ज्वालांनी दोन्ही दुचाकीस्वारांना घेरले. रस्त्यावरून जाणाऱ्या व परिसरातील नागरिकांनी प्रचंड खळबळ उडाल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, आगीचा वेग इतका थरकाप उडवणारा होता की, मदत मिळेपर्यंत दोन्ही तरुण गंभीररी्या भाजले गेले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
   मृत इकबाल याच्या कुटुंबावर गेल्या वर्षभरापासून संकटांची मालिका सुरू आहे. वर्षापूर्वी त्याच्या भावाचा अपघातात, तर सहा महिन्यांपूर्वी आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. आता कुटुंबाचा एकमेव कमावता आधार असलेला इकबालही काळाने हिरावून नेला. त्याच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि एक लहान मुलगी आहे.
 दुसरीकडे, मृत शफिक शेख हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तो एकटाच सांभाळत होता.  

COMMENTS