Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बी.फार्मसी महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभराजकिशोर मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ; जीपॅट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार

येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ ज

कौशल्याधारित शिक्षणामुळे उज्ज्वल भविष्य : आ. लहामटे  
आदित्य नर्सिंग महाविद्यालयाचा 7 व्या सत्राचा निकाल 100 टक्केयशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सन्मान
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गुणवंतांचा  गौरव


येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर यावेळी जीपॅट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरूवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. यावेळी कार्यक्रमास जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक मुंजे, माजी मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.तरके यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून सांस्कृतिक उपक्रमांचे शैक्षणिक जीवनातील महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची जोड अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. या प्रसंगी बी.फार्मसी अभ्यासक्रमातील जीपॅट परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या पल्लवी पडुळे, ऋचा जाधव, प्रतिक्षा उदार, अंजली जोशी या गुणवंत विद्यार्थीनींचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे. सत्कार सोहळ्यानंतर बोलताना राजकिशोर मोदी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, जीपॅट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत यश मिळवणे ही सर्व अंबाजोगाई शहरासाठी आणि संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाचा नांवलौकिक वाढतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. तसेच शिक्षणासोबत सांस्कृतिक आणि नैतिक मूल्ये जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. असे श्री.मोदी म्हणाले. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, गायन, नाट्यप्रयोग, वेशभूषा स्पर्धा तसेच विविध कलाप्रकारांमधून आपले कौशल्य सादर केले. आकर्षक सादरीकरणांमुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. आयोजन समितीच्या परिश्रमांमुळे हा महोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करतात, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सायली चोकडा यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाईचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी पुढाकार घेतला होता.

COMMENTS