Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू

कर्जत/प्रतिनिधी : पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना कर्जत - राशीन  महामार्गावर घडली. गुरुवारी सकाळी साड

खड्ड्याचा अंदाज न आल्याने ऑटो पडला खड्ड्यात .
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या बसला अपघात ; एक ठार, सहा जखमी

कर्जत/प्रतिनिधी : पहाटे व्यायामासाठी गेलेल्या तिघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना कर्जत – राशीन  महामार्गावर घडली. गुरुवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बेनवडी फाट्याजवळच्या बुवासाहेब नगर येथे हा अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अजून गंभीर जखमी झाला. अपघातातील सर्वजण बेनवडी येथील रहिवासी आहेत. या अपघातात ओमप्रकाश नाथा धुमाळ, वय : 18 या युवकाचा मोठा रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर संकेत परशुराम गदादे, वय : 18 यास पुढील उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. केदार अशोक गदादे, वय : 17 हा युवक या अपघातात गंभीर जखमी झाला. जखमींना मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कर्जतला नेण्यात आले. मयत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राशीन येथील शेखर जाधव यांच्या रुग्णवाहिकेतून कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सर्व युवक हे पोलीस भरतीसाठी सराव करत असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

COMMENTS