Homeताज्या बातम्या

पीएच.डी.साठी पंचसूत्रांचा अंगीकार आवश्यक : डॉ. संगीता फासाटे

श्रीरामपूर : ‘‘नांगरल्याविण भुई बरीच असते, फक्त शोधक आणि पेरणारा पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करण्यासाठी ध्यास, अभ्यास, श्रद्

मनपाच्या प्रोफेसर कॉलनी संकुलात पोटभाडेकरूंचाच दबदबा
तुम्हाला दिव्यांग मुले होतील…इंदुरीकर महाराजांनी दिला शाप
Sangamner : बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या (Video)


श्रीरामपूर : ‘‘नांगरल्याविण भुई बरीच असते, फक्त शोधक आणि पेरणारा पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करण्यासाठी ध्यास, अभ्यास, श्रद्धा, सबुरी आणि नम्रता या पंचसूत्रांचा अंगीकार करणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन डॉ. संगीता फासाटे यांनी केले.
श्रीरामपूर येथील इंदिरानगरमधील ‘ग्रंथा’ वाचनालयात वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. संगीता फासाटे यांचा मराठी विषयातील विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
प्रारंभी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. फासाटे यांच्या ‘साठोत्तरी ग्रामीण कवितेचा गेय आविष्कार : एक अभ्यास’ या संशोधन प्रबंधाचा परिचय करून दिला. ३७४ पृष्ठांच्या या प्रबंधात नऊ प्रकरणांचा समावेश असून ग्रामीण कवितेचे स्वरूप, पार्श्वभूमी, साधन कवींचे योगदान, गेय कवितांमधील विविध छंदवैशिष्ट्ये, कृषिविषयक कविता, सामाजिक जाणिवा, निसर्गाभिमुख कविता तसेच ग्रामीण गेय कवितांचे वाङ्मयीन मूल्यमापन आदी विषयांचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 अहिल्यानगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. माहेश्वरी गावित तसेच संशोधन मार्गदर्शक डॉ. वसंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास पूर्ण झाला असून तो संशोधन क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे मत डॉ. उपाध्ये यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी संशोधन क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्षा मंदाकिनी उपाध्ये यांच्या हस्ते डॉ. फासाटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेशानंद उपाध्ये, पल्लवी सैंदोरे, नितीन जोर्वेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
 मनोगतात डॉ. फासाटे यांनी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी खा. गोविंदराव आदिक, ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चेअरमन  पुष्पलता आदिक,अध्यक्ष डॉ. बबनराव आदिक, सचिव अविनाश आदिक, सहसचिव ऍड. जयंत चौधरी यांच्यासह शिक्षण, सामाजिक, साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर तसेच कुटुंबीयांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार गणेशानंद उपाध्ये यांनी मानले.

COMMENTS