श्रीगोंदा : टाकळी कडेवळीत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या सन १९९४-९५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहमेळावा नुकताच

श्रीगोंदा : टाकळी कडेवळीत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या सन १९९४-९५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘गेट-टुगेदर’ स्नेहमेळावा नुकताच अत्यंत उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी एकमेकांच्या गळाभेटी घेत शालेय जीवनातील सुवर्णक्षणांना आणि आठवणींना उजाळा दिला. या भावूक करणाऱ्या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक जनार्धन जायकर होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नावनोंदणीने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. याप्रसंगी दिवंगत शिक्षक आणि वर्गमित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आपल्या जडणघडणीत मोलाचे योगदान असलेल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, या बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे शाळेच्या कंपाउंड बांधकामासाठी २५ हजार रुपयांची देणगी शाळा प्रशासनाकडे सुपूर्द केली.
या सोहळ्यासाठी माजी शिक्षक औटी, चिखले, माजी केंद्रप्रमुख घोडके, मेहेत्रे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक सचिन खामकर, अनुसे, वंदना अनंत्रे व घोडके उपस्थित होते. सर्व गुरुजन आणि वर्गमित्रांसाठी शिवाजी अनंता खामकर व राजेंद्र हरीभाऊ पवार यांनी स्नेहभोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर भुजबळ यांनी केले, प्रास्ताविक रमेश शेलार यांनी मांडले, तर आभार शिवाजी सोनवणे यांनी मानले.

COMMENTS