संगमनेर : पुणे येथे 'अखिल लोककला सांस्कृतिक संस्थेने' आयोजित केलेल्या 'भारत महोत्सव २०२६' या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत अमृतवाहिनी इंटरनॅशन

संगमनेर : पुणे येथे ‘अखिल लोककला सांस्कृतिक संस्थेने’ आयोजित केलेल्या ‘भारत महोत्सव २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. त्रिशा सचिन कदम हिने लोकनृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून संगमनेरचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आता व्हिएतनाम येथे होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय कला महोत्सवातील’ लोकनृत्य स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
त्रिशाने यापूर्वीही विविध कला प्रकारांमध्ये आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. तिने बालरंगभूमी परिषद (मुंबई) आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (संगमनेर शाखा) आयोजित लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर ‘टीम ड्रीम लॉन्चर’ (नाशिक) च्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
ती सध्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या या आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल आणि यशाबद्दल माजी शिक्षण मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य जे. बी. सेठी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जोंधळे व तिचे वडील प्रा. सचिन कदम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS