Homeताज्या बातम्या

तनपुरवाडी येथील नदीचे लोकवर्गणीतून खोलीकरण; सरकारी मदतीशिवाय ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

पाथर्डी : पावसाळ्यात पूर नियंत्रण करण्यासाठी आणि उन्हाळ्यात भूजल पातळी वाढवून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तनपुरवाडी येथील गावहद्दीतील नदीचे खोलीकर

प्रामाणिक विद्यार्थ्यांना परिस्थिती आडवी येत नाही : ढोले  
विवेकानंद शाळेत मुलींना तायक्वांदो प्रशिक्षण
साहित्यिक चळवळ विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याची गरज – अभय आव्हाड

पाथर्डी : पावसाळ्यात पूर नियंत्रण करण्यासाठी आणि उन्हाळ्यात भूजल पातळी वाढवून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तनपुरवाडी येथील गावहद्दीतील नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही सरकारी अनुदानाची किंवा मदतीची वाट न पाहता ग्रामस्थांनी हे काम संपूर्णपणे लोकवर्गणीतून केले आहे.

नदी स्वच्छ आणि प्रवाही राहावी या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमासाठी आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, नगरसेवक बंडूशेठ बोरुडे, वर्षा मोरे, अजिनाथ मोरे आणि विनायक आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कामाच्या पूर्ततेच्या वेळी राधाकिसन सबलस, बन्सीभाऊ बुचकूल, आप्पासाहेब मोरे, विठ्ठल महाराज तांदळे, प्रकाश बडे, सुनील राठोड, बबन बुचकुल, बबनराव सबलस, महेश लगड, अमोल शिंदे, पप्पू माने यांच्यासह तनपुरवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि श्रमदानामुळे पाथर्डी तालुक्यातील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS