Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तर, शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही – केसरकर    

शिर्डी/प्रतिनिधी ः राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाची एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. असे असतांना, शालेय शिक्षणमंत्री दी

दोन टप्प्यात 50 हजार शिक्षकांची भरती
मराठी भाषा भवनासाठी 260 कोटींची तरतूद
विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा

शिर्डी/प्रतिनिधी ः राज्यात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाची एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. असे असतांना, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मात्र आशादायी वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नसल्याचे सांगितले. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. शिंदेंनी आमदारांची मने जिंकली. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत गेलो. अस काय घडलं की, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो याचे उत्तर वेळ आल्यावर देईल. ते काय घडल याच आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करावे, असा टोला देखील केसरकर यांनी लगावला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर शिर्डीत बोलत होते.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाचा शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच तोंडभरुन कौतुक करण्यात आलय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर भाष्य केले. उद्धव ठाकरेंविषयी आदर असल्याचेही दीपक केसरकर म्हणाले. दीपक केसरकर म्हणाले, अजित दादा काहीही बोलले तरी त्यांचे मन मात्र निर्मळ आहे. याची मला खात्री आहे. मी अजित पवार यांच्याबरोबर काम केलेले आहे. बोलताना फटकऴ बोलतील पण एक विरोधी पक्ष नेता कसा असावा याचे ते उत्तम उदाहरण आहेत. जसा आम्हाला मुख्यमंत्र्याचा अभिमान आहे. तसा आम्हाला अजित पवारांचा देखील अभिमान आहे, दीपक केसरकर असेही म्हणाले. दीपक केसरकर उद्धव ठाकरेंविषयी बोलताना म्हणाले, कटुता कमी करणे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मी त्यांचा आदर करणारा मनुष्य आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलेले नव्हते. जेव्हा घर पेटतं तेव्हा अगोदर आग विजवावी लागते. असे मी त्यांना सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. मात्र टीव्हीवर जे दाखवण्यात आले त्याचे दुख वाटले.

COMMENTS