बीड : शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ’शिवसंग्राम भवन’ येथे नुकतीच शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर

बीड : शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योतीताई मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ’शिवसंग्राम भवन’ येथे नुकतीच शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. आगामी काळातील संघटनेची बांधणी आणि विस्तार या दृष्टीने या बैठकीत विविध महत्त्वाच्या जबाबदार्यांचे वाटप करण्यात आले.या बैठकीत संघटनेच्या विविध आघाड्यांवर नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली.यामध्ये श्री.कुतूबभाई यांना अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष,श्री. सुनील शिंदे यांना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष,श्री. विठ्ठल ढोकणे यांना सामाजिक न्याय विभाग बीड तालुकाध्यक्ष, श्री.शेख आंबेद भाई यांना अल्पसंख्यांक आघाडी बीड जिल्हा उपाध्यक्ष,श्री.अमजद भाई पठाण यांना अल्पसंख्यांक आघाडी बीड शहराध्यक्ष तर श्री.शेख लालाभाई यांना अल्पसंख्यांक आघाडी, बीड तालुकाध्यक्ष अश्या जबाबदार्या देण्यात आल्या. शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योतीताई मेटे आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्रे देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन केलेल्या सरपंच व सदस्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये कपिलधारवाडी येथील युवा नेते रुद्रा महाकले यांचे बंधू श्री. चंद्रसेन अश्रुबा महाकले यांचा गौरव करण्यात आला.तसेच, पोलीस पाटील पदाच्या परीक्षेत यश मिळवून चर्हाटा येथे नियुक्त झालेले श्री. ज्ञानेश्वर बबनराव उबाळे आणि बेलखंडी पाटोदा येथे पोलीस पाटील पदी नियुक्त झालेल्या सौ.अश्विनी बाळू जाधव यांच्या वतीने श्री. बाळासाहेब जाधव यांचाही डॉ. ज्योतीताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिवसंग्राम महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सौं. संगीताताई ठोसर यांचा वाढदिवस यावेळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी त्यांना अभिष्टचिंतन करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सुहास पाटील यांनी केले, तर प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलंगडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप करताना डॉ.ज्योतीताई मेटे यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना संघटना वाढीसाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. शेवटी, बीड तालुकाध्यक्ष पंडित माने यांनी उपस्थितांचे आभार मानले.या बैठकीला शिवसंग्रामचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS