Homeताज्या बातम्या

एल निनो परिस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक 

संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजनाच्या सूचना

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एल निनो परिस्थितीबाबत आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बै

भयंकर ! १९ वर्षीय तरुणावर दोघा तरुणांचा अनैसर्गिक अत्याचार I LOKNews24
शिक्षण व्यवस्थेच्या यशात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची : राष्ट्रपती मुर्मू
के.जे.सोमैया महाविद्यालयात महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…

नाशिक : नाशिक जिल्ह्यात एल निनो परिस्थितीबाबत आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व विभागप्रमुख व गट विकास अधिकारी यांची दुरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली.

या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यात उद्भवणाऱ्या एल निनो परिस्थितीबाबत सर्व गट विकास अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. एल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पावसाळा हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यावर मात करण्यासाठी आतापासून नियोजन केल्यास संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीपासून बचाव करता येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकीत सांगितले.

ग्रामीण भागातील टंचाई आराखडे हे लवकरात लवकर तयार करावे. गेल्या 5 वर्षात ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली अशा गावांचा समावेश देखील टंचाई आराखड्यात करण्यात यावा, ग्रामपंचायतीचे पाण्याचे स्रोत, खाजगी पाण्याचे स्त्रोत या माहितीची संकलन करून पाणी कपातीस आतापासूनच सुरवात करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या बैठकीत दिले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी देखील एल निनोमुळे निर्माण होणा-या परिस्थितीबाबत मार्गदर्शन केले.

COMMENTS