Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये प्लॅस्टिक व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात

कोपरगाव शहर : ‘प्लॅस्टिक मुक्त कोपरगाव’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोपरगाव पंचायत समिती कार्यालय व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर व व्यवस्थापन विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. तालुक्यातील सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी व शालेय मुख्याध्यापक यांचा या कार्यशाळेत मोठा सहभाग होता. मंगळवार (दि. ३१ मार्च) रोजी के. जे. सोमैय्या महाविद्यालयात आयोजित कार्यशाळा कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी संदीप रोहमारे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी पुणे येथील ‘जलबिरादरी’ संस्थेचे सदस्य व ‘सागर मित्र’ अभियानाचे प्रणेते विनोद बोधनकर यांनी प्लॅस्टिक कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम व त्याचा प्रभावी पुनर्वापर कसा करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्लॅस्टिक हा नष्ट न होणारा व पर्यावरणासाठी अत्यंत घातक घटक असून त्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेस अभिनेते चिन्मय उदगीरकर, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, ‘नमामी गोदे’चे राजेश पंडित, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे, जलबिरादरी संस्थेचे नरेंद्र चूग, कॅप्टन बोधनकर, पत्रकार विनोद जवरे, सोमनाथ डफळ यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर डागा यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आदिनाथ ढाकणे, प्रा. विजय कापसे, सचिन बोरुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त मंत्री उदय सामंत यांची कार्यवाही ; प्रभारी म्हणून जिल्हाप्रमुखांकडे जबाबदारी 
कोपरगाव तालुका शिक्षक भारती संघटना कार्यकारिणी जाहीर
कोपरगावात मंगळवारी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन कार्यशाळा

कोपरगाव शहर : ‘प्लॅस्टिक मुक्त कोपरगाव’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कोपरगाव पंचायत समिती कार्यालय व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर व व्यवस्थापन विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. तालुक्यातील सरपंच, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी व शालेय मुख्याध्यापक यांचा या कार्यशाळेत मोठा सहभाग होता.

मंगळवार (दि. ३१ मार्च) रोजी के. जे. सोमैय्या महाविद्यालयात आयोजित कार्यशाळा कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी संदीप रोहमारे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

यावेळी पुणे येथील ‘जलबिरादरी’ संस्थेचे सदस्य व ‘सागर मित्र’ अभियानाचे प्रणेते विनोद बोधनकर यांनी प्लॅस्टिक कचऱ्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम व त्याचा प्रभावी पुनर्वापर कसा करावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्लॅस्टिक हा नष्ट न होणारा व पर्यावरणासाठी अत्यंत घातक घटक असून त्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेस अभिनेते चिन्मय उदगीरकर, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, ‘नमामी गोदे’चे राजेश पंडित, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बबन वाघमोडे, प्रशांत तोरवणे, जलबिरादरी संस्थेचे नरेंद्र चूग, कॅप्टन बोधनकर, पत्रकार विनोद जवरे, सोमनाथ डफळ यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर डागा यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आदिनाथ ढाकणे, प्रा. विजय कापसे, सचिन बोरुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS