संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित पद्मपाणि राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिमो

संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित पद्मपाणि राष्ट्रीय-राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अजिमोद्दिन शेख यांना पद्मपाणि उत्कृष्ट सामाजिक कार्य 2026 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात पोलिस निरीक्षक पल्लवी जाधव आणि नाशिकचे पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांच्या हस्ते शेख यांना सन्मानपत्र व मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. अजिमोद्दिन शेख यांनी सामाजिक कार्यामध्ये विविध आंदोलन, उपोषणे, माहिती अधिकाराचा प्रभावी वापर, निवेदने आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये आवाज उठवत कारवाई घडवून आणण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या या धाडसी व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शेख यांनी संस्थापक अध्यक्ष दिलीप तरकसे व संपूर्ण टीमचे आभार मानले. या प्रसंगी त्यांच्या पत्नी खातून शेख, शेतकरी संघटनेचे रामप्रसाद गाडे, रघुनाथ नावडे, संजय खटके, प्रा. राम बोडखे, प्रा. हेमाली बोडखे तसेच पत्रकार रहेमान सय्यद उपस्थित होते. या पुरस्कारानंतर विविध स्तरांतून अजिमोद्दिन शेख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS