Homeताज्या बातम्याबीड

गेवराई बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तत्काळ सुरू करा; अन्यथा ‘छावा क्रांतिवीर सेने’चा आंदोलनाचा इशारा

गेवराई बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे दीर्घकाळापासून बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे कॅमेरे तत्काळ सुरू करण्यात याव

मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
इमामपूर रोडवरील कथित अवैध खनन प्रकरण तापले; करोडो रुपयांच्या मुरूम, दगड व वाळू उपशाचा आरोपराजकीय वरदहस्ताशिवाय हे शक्य नाही – समाजसेवक इम्रान जागीरदार
बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती



गेवराई बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे दीर्घकाळापासून बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे कॅमेरे तत्काळ सुरू करण्यात यावेत, अन्यथा आठ दिवसांत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेचे राहुल चाळक पाटील यांनी आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.गेवराई बसस्थानक हे तालुक्यातील एक महत्त्वाचे आणि वर्दळीचे केंद्र आहे. येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचाच फायदा घेत बसस्थानक परिसरात पाकीटमारी, चोर्‍या आणि महिलांची छेडछाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.निवेदनात म्हटले आहे की, बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन अवैध प्रवासी वाहतूक आणि इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वाढली आहे. एखादी दुर्घटना किंवा गुन्हा घडल्यास पोलिसांना तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यान्वित असणे अत्यंत आवश्यक आहे.या गंभीर बाबीची दखल घेऊन आगार प्रशासनाने आठ दिवसांच्या आत सर्व सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करून सुरू करावेत. जर या कालावधीत कार्यवाही न झाल्यास छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहुल चाळक पाटील यांनी दिला आहे.यावेळी मुक्ताराम मोटे,विवेक मोटे,दत्ता काटकर, परमेश्वर चाळक,गौरव चौधरी, कृष्णा पालेकर,अशोक मोटे,यासह अनेक नागरिक उपस्थित होते,या निवेदनामुळे आता एसटी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS