हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत 18 जूनपर्यंत वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत 18 जूनपर्यंत वाढ

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना दुसर्‍या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे.

*BREAKING: अखेर कोरोनावर औषध सापडलं… पाहत रहा LokNews24*
म्हाळुंगी पुलावरील 10 सुशोभीकरण कुंड्याची विकृत प्रवृत्ती कडून नासाडी
कोळकेवाडी दूर्ग : किल्ल्यावर चढाई करताना एक वेगळाच अनुभव

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना दुसर्‍या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शुक्रवार दि.18 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणामध्ये संबंधित महिला व तिचा साथीदार अमोल मोरे यांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली होती. महिलेशी शरीरसंबंधांचे आमीष दाखवून व ते करण्यास भाग पाडून त्याचे चित्रीकरण केले व त्यावरून ब्लॅकमेल करून 1 कोटीची खंडणी मागितल्याच्या पहिल्या गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर सात दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना अशाच प्रकारच्या पण 3 कोटीची खंडणी मागितल्याच्या दुसर्‍या दाखल असलेल्या प्रकरणामध्ये या दोघांना वर्ग करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना शुक्रवार दि.18 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नगर तालुक्यातील प्रकरण हे गेल्या महिन्याभरापासून चांगले चर्चेचे झाले आहे. पहिल्या घटनेमध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वरील दोन आरोपींना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली होती. त्याचा तपास सुरू असतानाच नगर तालुक्यामध्ये दुसरा गुन्हा याच आरोपींच्या विरोधामध्ये तीन कोटी रुपयांच्या खंडणीचा दाखल झाला होता. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना त्यांच्यासमवेत अटक केली होती. या घटनेमध्ये संबंधित महिला व अमोल मोरे हा मुख्य आरोपी असल्यामुळे त्यांचा तपास पोलिसांना करायचा आहे तसेच त्याचे अजून कोण साथीदार आहेत, याचा सुद्धा तपास दुसर्‍या गुन्ह्यात करायचा आहे तसेच या दोघांचे संभाषण व त्यांच्या ताब्यातून मोबाईल हस्तगत करण्यात आले असून, ते पुढील तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहेत. पोलिस कोठडीतील चौकशीत आणखी काही महत्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS