गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या हिशोबाच्या वादातून कीर्तनकार कैलास महाराज आनंदे यांच्यावर अमानुष हल्ला झाल्याची धक्काद

गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या हिशोबाच्या वादातून कीर्तनकार कैलास महाराज आनंदे यांच्यावर अमानुष हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील लोटस खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना कळताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना मराठवाडा निरीक्षक तथा युवासेना लोकसभा संपर्कप्रमुख बीड बाजीराव दादा चव्हाण यांच्या वतीने महाराजांना 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली. मदतीच्या वेळी शिवसेनेचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले, शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, युवासेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, युवासेना विधानसभा अध्यक्ष तथा नगरसेवक सुरज चुंगडे, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, युवासेना उपजिल्हाप्रमुख काशिनाथ जाधव, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, विष्णुदासजी महाराज सुरवसे, शिवसेना वैदयकीय मदत कक्ष बीड जिल्हाप्रमुख महादेव मातकर, शिवसेना वैदयकीय मदत कक्ष बीड उपजिल्हाप्रमुख शरद झोडगे, धर्मवीर प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष लिंबाजी जाधव पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे कैलास महाराजांशी संवाद साधत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. राज्यात सध्या वारकरी आणि कीर्तनकारांवर होणार्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अशा घटना घडल्यामुळे वारकरी संप्रदायात संताप व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महाराष्ट्रात साधुसंतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान, या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

COMMENTS