सुपा : रायतळे येथील चितळकर वस्तीवर काही दिवसांपूर्वी घडलेल्या जबरी चोरी व दरोड्याच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार

सुपा : रायतळे येथील चितळकर वस्तीवर काही दिवसांपूर्वी घडलेल्या जबरी चोरी व दरोड्याच्या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर आमदार काशिनाथ दाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी चितळकर वस्ती परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने हायमास्ट सोलर पोल उभारण्याची मागणी आमदार दाते यांच्याकडे केली. या मागणीची तातडीने दखल घेत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे आवश्यक सूचना दिल्या.त्यानंतर अवघ्या काही तासांत चितळकर वस्तीवर हायमास्ट सोलर पोल उभारण्यात आला. त्यामुळे परिसरात प्रकाशव्यवस्था उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, वसंतदादा चेडे, दत्तानाना पवार, मनोज मुंगसे, सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कोठुळे, ग्रामसेवक गणेश घुले, तलाठी प्रशांत भोईटे तसेच ग्रामस्थ सुदाम येणारे, योगेश (राहुल) येणारे, शिवदास चितळकर, गोरख साबळे, मनोज चितळकर, प्रमोद चितळकर, देविदास मेमाणे, हृतिक दरेकर आदी उपस्थित होते.

COMMENTS