Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोसा खिंड प्रकल्पाला हक्काचे पाणी द्यावे; सभापती तापकीर ; कर्जतसाठी कुकडी, सीना व घोड कालव्यांचे आवर्तन सोडण्याची मागणी 

कर्जत : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कर्जत तालुक्यातील शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळावा यासाठी कुकडी, सीना व घोड या तीनही कालव्यांचे आवर्तन तात्काळ सोडावे, तसेच भोसा खिंड प्रकल्पाला कुकडी प्रकल्पामधून हक्काचे कायमस्वरूपी पाणी देण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भाजपचे ज्येष्ठ नेते काकासाहेब तापकीर  यांनी केली आहे. असे निवेदन त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.   यासंदर्भात माहिती देताना सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले की, सध्या तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली असून विहिरी, तलाव आणि पाणीसाठे वेगाने कोरडे पडत आहेत. उन्हाळी पिके जोमात असली तरी पाण्याअभावी ती वाळण्याच्या मार्गावर आहेत. फळबागांनाही पाण्याची अत्यंत गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर  कुकडी घोड व सीना या तीनही कालव्यांचे आवर्तन सुरू करणे अत्यावश्यक आहे. मागील आवरताना मध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना कुकडी प्रकल्पाचे पाणी पुरेसे मिळाले नाही.   “शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके उभी केली आहेत. सध्या पिकांना योग्य पाणी मिळाले, तर चांगले उत्पादन होईल; अन्यथा काही दिवसांतच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे,” असे त्यांनी नमूद केले. विशेषतः भाजीपाला, ऊस, तसेच इतर पिकांना तातडीने पाणी मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचा म्हणजे फळबागांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याशिवाय ग्रामीण भागात जनावरांसाठीही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित होत असून, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाणीअभावी जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. असे सांगून तापकीर पुढे म्हणाले की, वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत असल्याने विहिरी व बोअरवेलद्वारे पाणी उचलणे कठीण झाले आहे. परिणामी शेतीची कामे ठप्प होण्याच्या स्थितीत आली आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कालव्यांचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे. “शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही, तर तालुक्यातील शेती व पशुधनावर मोठा परिणाम होईल,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आवर्तन सोडण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. भोसा प्रकल्पाचा कुकडीचे पाणी कायमस्वरूपी देण्याबाबत कसा समावेश करण्यात येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. – जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

आरक्षण उपवर्गीकरण समितीचा अहवाल सार्वत्रिक करा : माकप
व्यक्ती बेपत्ता; शोधासाठी बेलवंडी पोलिसांचे आवाहन
शेवगावच्या बी डी ओ सोनल शहा यांची अखेर बदली रद्द

कर्जत : वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कर्जत तालुक्यातील शेतीसमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले असून, शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळावा यासाठी कुकडी, सीना व घोड या तीनही कालव्यांचे आवर्तन तात्काळ सोडावे, तसेच भोसा खिंड प्रकल्पाला कुकडी प्रकल्पामधून हक्काचे कायमस्वरूपी पाणी देण्यात यावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व भाजपचे ज्येष्ठ नेते काकासाहेब तापकीर  यांनी केली आहे. असे निवेदन त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे.  

यासंदर्भात माहिती देताना सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले की, सध्या तालुक्यात तापमानात मोठी वाढ झाली असून विहिरी, तलाव आणि पाणीसाठे वेगाने कोरडे पडत आहेत. उन्हाळी पिके जोमात असली तरी पाण्याअभावी ती वाळण्याच्या मार्गावर आहेत. फळबागांनाही पाण्याची अत्यंत गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर  कुकडी घोड व सीना या तीनही कालव्यांचे आवर्तन सुरू करणे अत्यावश्यक आहे. मागील आवरताना मध्ये देखील अनेक शेतकऱ्यांना कुकडी प्रकल्पाचे पाणी पुरेसे मिळाले नाही.  

“शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके उभी केली आहेत. सध्या पिकांना योग्य पाणी मिळाले, तर चांगले उत्पादन होईल; अन्यथा काही दिवसांतच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे,” असे त्यांनी नमूद केले. विशेषतः भाजीपाला, ऊस, तसेच इतर पिकांना तातडीने पाणी मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वात महत्त्वाचा म्हणजे फळबागांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

याशिवाय ग्रामीण भागात जनावरांसाठीही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित होत असून, चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाणीअभावी जनावरांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर होणार आहे. असे सांगून तापकीर पुढे म्हणाले की,

वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत असल्याने विहिरी व बोअरवेलद्वारे पाणी उचलणे कठीण झाले आहे. परिणामी शेतीची कामे ठप्प होण्याच्या स्थितीत आली आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन कालव्यांचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.

“शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही, तर तालुक्यातील शेती व पशुधनावर मोठा परिणाम होईल,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आवर्तन सोडण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. भोसा प्रकल्पाचा कुकडीचे पाणी कायमस्वरूपी देण्याबाबत कसा समावेश करण्यात येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.

– जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

COMMENTS