संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून आगामी काळामध्ये पंजाब प्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीत सिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मिशन 50 लिटर क्षमतेच्या गाई गाई निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहे. तर कमी गाई जास्त दूध हे सूत्र आगामी काळात वापरा असे आवाहन माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन 50 लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या तालुक्यातील 1500 युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, पंजाबचे पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे,नवनाथ आरगडे त्याचप्रमाणे तालुक्यातील युवक दूध उत्पादक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बोलताना पंजाब पीडीएफचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल म्हणाले की, पंजाब हे राज्य कृषी व दूध उत्पादनामध्ये देशात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रामध्ये पंजाबने केलेले संशोधन हे संपूर्ण देशामध्ये जात आहे .रणजीत सिंह देशमुख 2009 पासून पंजाब मधील दूध उत्पादकांच्या संपर्कात असून त्या माध्यमातून एमडीएफ गोठा ,मुरघास या संकल्पना महाराष्ट्रात राबवल्या गेल्या आहेत. आगामी काळामध्ये पन्नास लिटर दूध निर्मिती हे मिशन घेऊन संगमनेर मधून काम सुरू झाले आहे. हा महाराष्ट्रासाठी संगमनेर पॅटर्न ठरणार आहे. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1978 मध्ये पंजाब मधून गाई आणून आपण दूध उत्पादन सुरू केले. दूध संघाचे जे चेअरमन आतापर्यंत झाले त्यांनी आतापर्यंत खूप चांगले काम केले. याचबरोबर दूध संघाच्या माध्यमातून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. मिशन 50 लिटर हा अत्यंत चांगला उपक्रम असून ही सर्वांनी मोहीम म्हणून राबवा. सहकाराने नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून सहकार हा सर्वांचा आहे तो टिकला पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय तिवारी यांनी केले सूत्रसंचालन डॉ. कोमल मस्के यांनी केले तर डॉ. प्रमोद पावशे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून आगामी काळामध्ये पंजाब प्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीत सिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मिशन 50 लिटर क्षमतेच्या गाई गाई निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल असे गौरवोद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहे. तर कमी गाई जास्त दूध हे सूत्र आगामी काळात वापरा असे आवाहन माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन 50 लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या तालुक्यातील 1500 युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, पंजाबचे पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे,नवनाथ आरगडे त्याचप्रमाणे तालुक्यातील युवक दूध उत्पादक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना पंजाब पीडीएफचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल म्हणाले की, पंजाब हे राज्य कृषी व दूध उत्पादनामध्ये देशात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रामध्ये पंजाबने केलेले संशोधन हे संपूर्ण देशामध्ये जात आहे .रणजीत सिंह देशमुख 2009 पासून पंजाब मधील दूध उत्पादकांच्या संपर्कात असून त्या माध्यमातून एमडीएफ गोठा ,मुरघास या संकल्पना महाराष्ट्रात राबवल्या गेल्या आहेत. आगामी काळामध्ये पन्नास लिटर दूध निर्मिती हे मिशन घेऊन संगमनेर मधून काम सुरू झाले आहे. हा महाराष्ट्रासाठी संगमनेर पॅटर्न ठरणार आहे.
तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1978 मध्ये पंजाब मधून गाई आणून आपण दूध उत्पादन सुरू केले. दूध संघाचे जे चेअरमन आतापर्यंत झाले त्यांनी आतापर्यंत खूप चांगले काम केले. याचबरोबर दूध संघाच्या माध्यमातून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. मिशन 50 लिटर हा अत्यंत चांगला उपक्रम असून ही सर्वांनी मोहीम म्हणून राबवा. सहकाराने नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून सहकार हा सर्वांचा आहे तो टिकला पाहिजे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय तिवारी यांनी केले सूत्रसंचालन डॉ. कोमल मस्के यांनी केले तर डॉ. प्रमोद पावशे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS