संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकास कामांच्या योजना राबवण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मार्गी लावला आहे. बेलसोंडा वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेसाठी मदत करून या नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सोडवला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वस्तीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, ग्रामपंचायत, लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या तीव्र पार्श्वभूमीवर या वस्तीला पाईपलाईनची अत्यंत गरज होती. ग्रामपंचायतीकडे काही निधी उपलब्ध असला तरी उर्वरित निधी उभारण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता भासत होती. याच अनुषंगाने वस्तीतील महिलांनी पुढाकार घेत युवक नेत्या डॉ. जयश्री थोरात यांची भेट घेतली. “आमच्या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी,” अशी भावनिक मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. महिलांच्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत डॉ. जयश्री थोरातांनी तात्काळ प्रतिसाद देत पाईपलाईन कामासाठी मदत केली. त्यांच्या या तत्पर निर्णयामुळे रखडलेला पाणीप्रश्न सुटण्यास मोठी चालना मिळाली आहे. माजी सरपंच बाबाजी दगडू घुले यांनी सांगितले की, “महिलांच्या डोक्यावरील हंडा आता कायमचा उतरणार असून, हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे.” विशेष म्हणजे १९७२ पासून सुरू असलेली टँकर व्यवस्था लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे आता कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे. यावेळी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्यासह रंजना घुले, अर्चना घुले, विद्या घुले, अलका घुले, शोभा घुले, चारुशीला घुले, जयश्री घुले, भिंबाई घुले, जनाबाई घुले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकास कामांच्या योजना राबवण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मार्गी लावला आहे. बेलसोंडा वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेसाठी मदत करून या नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सोडवला असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पठार भागातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वस्तीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणीप्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, ग्रामपंचायत, लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणीटंचाईच्या तीव्र पार्श्वभूमीवर या वस्तीला पाईपलाईनची अत्यंत गरज होती. ग्रामपंचायतीकडे काही निधी उपलब्ध असला तरी उर्वरित निधी उभारण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता भासत होती.
याच अनुषंगाने वस्तीतील महिलांनी पुढाकार घेत युवक नेत्या डॉ. जयश्री थोरात यांची भेट घेतली. “आमच्या वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी,” अशी भावनिक मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. महिलांच्या या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत डॉ. जयश्री थोरातांनी तात्काळ प्रतिसाद देत पाईपलाईन कामासाठी मदत केली. त्यांच्या या तत्पर निर्णयामुळे रखडलेला पाणीप्रश्न सुटण्यास मोठी चालना मिळाली आहे.
माजी सरपंच बाबाजी दगडू घुले यांनी सांगितले की, “महिलांच्या डोक्यावरील हंडा आता कायमचा उतरणार असून, हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे.” विशेष म्हणजे १९७२ पासून सुरू असलेली टँकर व्यवस्था लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे आता कायमची बंद होण्याच्या मार्गावर आहे.
यावेळी बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्यासह रंजना घुले, अर्चना घुले, विद्या घुले, अलका घुले, शोभा घुले, चारुशीला घुले, जयश्री घुले, भिंबाई घुले, जनाबाई घुले यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS