Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआ देणार भाजपला देणार धोबीपछाड

मुंबई/प्रतिनिधी ः देशात लोकसभेच्या निवडणुकांसाठी अजून एक वर्षाचा अवधी असला तरी, सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून, त्यादिशेने

आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत.
‘सामाजिक न्याया’ चा पुरस्कर्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज
दुर्दैवी ! लोकलच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू I LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः देशात लोकसभेच्या निवडणुकांसाठी अजून एक वर्षाचा अवधी असला तरी, सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून, त्यादिशेने रणनीती आखण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे भाजप मजबूत स्थितीत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी, काँगे्रसने अंतर्गत केलेल्या सर्व्हेतून महाविकास आघाडी आगामी लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढल्यास भाजपचे पानीपत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण काँगे्रसच्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला 40-45 जागा मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली असून, शिंदे गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गट एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी आघाडी काम करत आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेची माहिती समोर आली आहे. त्यात महाविकास आघाडीला 40 ते 45 जागा मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता यावरून चर्चांना उधाण आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून राज्यातील अनेक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांत सर्व्हे करण्यात आहे. ग्राऊंड लेवलवर करण्यात या सर्व्हेमध्ये असंख्य लोकांची मते जाणून घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात जाऊन मतदारांची मते विचारात घेण्यात आली. त्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 40 ते 45 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या सर्व्हेत भाजप तसेच शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी एका वृत्तवाहिनीने देशभरात सर्व्हे केला होता. त्यात केंद्रातील मोदी सरकारला लोकसभेत पुन्हा बहुमत मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसच्या सर्व्हेत राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. सर्व्हेत मतदारसंघातील स्थिती पाहून आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये तयारी सुरू केलेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाजपविरोधी पक्षांशी आम्ही युती करणार असल्याची नाना पटोले यांनी सांगितले आहे. याशिवाय महाविकास आघाडीत आम्हाला कुणाबद्दलही संभ्रम किंवा मतभेद नसल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे

COMMENTS