खरवंडी कासार : तालुक्यातील बडेवाडी येथे संत भगवान बाबा यांच्या ९२ व्या फिरता नारळी सप्ताहानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पाथर्डी आगारातून दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर तासाला बस सोडण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. या सप्ताहासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी ऍड. प्रताप ढाकणे यांनी विशेष पाठपुरावा केला. यावेळी बडेवाडी येथील सप्ताह समितीचे पदाधिकारी व तरुण सहकारी उपस्थित होते. सप्ताहासाठी प्रताप ढाकणे यांनी १०१ क्विंटल साखरेचे योगदान दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान, बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आगारप्रमुख अमित बनसोडे यांना समितीतर्फे निवेदन देण्यात आले होते. भाविकांच्या प्रतिसादानुसार बस सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

खरवंडी कासार : तालुक्यातील बडेवाडी येथे संत भगवान बाबा यांच्या ९२ व्या फिरता नारळी सप्ताहानिमित्त भाविकांच्या सोयीसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पाथर्डी आगारातून दुपारी १ ते रात्री ११ वाजेपर्यंत दर तासाला बस सोडण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
या सप्ताहासाठी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसेच पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असल्याने बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी ऍड. प्रताप ढाकणे यांनी विशेष पाठपुरावा केला.
यावेळी बडेवाडी येथील सप्ताह समितीचे पदाधिकारी व तरुण सहकारी उपस्थित होते. सप्ताहासाठी प्रताप ढाकणे यांनी १०१ क्विंटल साखरेचे योगदान दिल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
दरम्यान, बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आगारप्रमुख अमित बनसोडे यांना समितीतर्फे निवेदन देण्यात आले होते. भाविकांच्या प्रतिसादानुसार बस सेवा सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS