Homeताज्या बातम्यादेश

तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळाविजय यांना काँगे्रसनंतर सीपीआयचा पाठिंबा

चेन्नई : तामिळनाडूमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून अभिनेते विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची शक्यता अधिक बळकट होत असल्याची चर्चा

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारीखासदार प्रफुल्ल पटेल यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळख
खा. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुकखासदार संजय राऊतांनी मात्र दर्शवली असहमती
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा


चेन्नई : तामिळनाडूमध्ये नव्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून अभिनेते विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाची शक्यता अधिक बळकट होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विश्‍वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, विदुथलाई चिरुथैगल कच्ची तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तामिळगा वेत्री कळघमला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
तामिळगा वेत्री कळघमचे प्रमुख विजय यांनी सलग तिसर्‍या दिवशी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ सिद्ध करण्यावर भर दिला जात असून त्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी राज्यपालांनी विजय यांना बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचा पाठिंबा सिद्ध करण्यास सांगत दोन वेळा प्रस्ताव परत पाठवला होता. मात्र आता हा आवश्यक आकडा पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामिळगा वेत्री कळघमकडे 108 आमदारांचे समर्थन आहे. त्याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रत्येकी दोन आमदार तसेच विदुथलाई चिरुथैगल कच्चीचे चार आमदार पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनीही यापूर्वीच समर्थन जाहीर केल्याची माहिती आहे.
दरम्यान, तामिळगा वेत्री कळघमने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णाद्रमुक यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, तर पक्षाचे सर्व आमदार सामूहिक राजीनामे देतील. जनतेचा सर्वाधिक पाठिंबा मिळालेल्या पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचा डाव सुरू असल्याचा आरोपही पक्षाकडून करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णाद्रमुक नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला.

COMMENTS