Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरसापुर बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी; तहसीलदार, माहूर यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

माहूर : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ माहू

केज नगरपंचायत घरकुल प्रकरणावरून चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; आंदोलनाचा इशारा
शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : घोगरे; आ.संजय गायकवाड, धिरेंद्र शास्त्री यांचा तीव्र निषेध
जामखेडचे नाव अहिल्यातीर्थ करा; जनजागरण युवा मंचची मागणी ; तहसीलदारांकडे निवेदन


माहूर : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ माहूर येथे बुधवारी (दि. 6 मे रोजी ) सकाळी 11 वाजता निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते सोनू चौधरी आणि विनोद पाटील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
या वेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदार, माहूर यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली. सदर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून माहूर शहरातही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. कपिलेश्वर मंदिर येथून सकाळी साडेदहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे प्रमुख मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान महिलांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत जनजागृती केली. आरोपीला फाशी द्या, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या निषेध मोर्च्यातून प्रशासनाने या अमानवीय घटनेची तात्काळ दखल घेऊन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार विजय आमले, वसंत कपाटे, नंदू संतान, नंदकुमार जोशी, गजानन भारती, संजय बनसोडे, जयकुमार अडकीने, राम दातीर, शंकर भालेराव, पद्मताई गीरे,  सुरेखा तळणकर, स्वाती आडे, विकास जोशी, अभय जाधव, महेश आडे, आदित्य पांडे, योगेश परसावळे आदींसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS