Homeताज्या बातम्या

कंत्राटी भरतीत ट्रेनी शिक्षकांना सामावून घ्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

बीड: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ट्रेनी शिक्षकांना कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये प्राधान्याने सा

कर्जतमध्ये पोलिसांवर उचलला हात
यंदा 132 दिवस उच्च न्यायालयाची दारे बंद
संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; ११ जणांचा मृत्यू

बीड: मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ट्रेनी शिक्षकांना कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये प्राधान्याने सामावून घेऊन तात्काळ नियुक्ती द्यावी, या प्रमुख मागणीसाठी ट्रेनी शिक्षकांनी गुरुवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी एक ट्रेनी शिक्षक याप्रमाणे ११ महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही संबंधित शिक्षकांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

यावेळी ट्रेनी शिक्षकांच्या वतीने बोलताना जिल्हाध्यक्ष नितीन आगम आणि राजेंद्र आमटे यांनी सांगितले की, शासनाने प्रशिक्षण देताना भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही अनेक ट्रेनी शिक्षक बेरोजगार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत ट्रेनी शिक्षकांना प्राधान्य देऊन त्यांची नियुक्ती करण्यात यावी.

निदर्शनादरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ट्रेनी शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात नितीन आगम, राजेंद्र आमटे, विकास मगर, दत्ता कातकडे, राहुल शेळके, सना तांबोळी, प्रदीप परमेश्वर, विकास बाबासाहेब, किरण गीते, मीना खटके, स्वाती घोडके, श्यामबाला डाके, आश्विनी गायकवाड, रोहिणी मनमोडे, स्नेहा शिरसाट, शेख रशीद, सिताराम डोके, संतोष मोरे, ऋषिकेश गवळी, सागर बाबर, अशोक सटले, नितीन शेलार, आसमा शेख, राजेंद्र वनवे, आप्पा नागरगोजे, चांगदेव केदार यांच्यासह मोठ्या संख्येने ट्रेनी शिक्षक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर करून कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत ट्रेनी शिक्षकांचा समावेश करण्याची आग्रही मागणी केली.

COMMENTS