Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृषाली कडलग यांना नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान

महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल

संगमनेर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका शिक्षिका वृषाली कडलग यांना ’नॅशनल वुमन एक्सलन्स अव

संशोधनाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवता अभ्यासने गरजेचे 
वाकडीत एक हजार विद्यार्थांना बुट आणि सॉक्सचे वाटप
पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

संगमनेर/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका शिक्षिका वृषाली कडलग यांना ’नॅशनल वुमन एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित असलेला नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड देशाच्या राजधानीत दिल्ली येथे महिला दिनानिमित्त शानदार समारंभात प्रदान करण्यात आला.
टीम जेनिथ इंडियाच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार दिल्ली येथील नविन महाराष्ट्र सदन येथे करण्यात आला. त्यात नॅशनल वुमन्स एक्सलन्स अवॉर्ड, पंडित बिरजू महाराज नृत्यरत्न पुरस्कार, राष्ट्रीय संगीतरत्न पुरस्कार, योगरत्ना पुरस्कार व फैशन आइकॉन ऑफ़ इंडिया हे पुरस्कार प्रदान करण्यात आले याप्रसंगी खासदार सुनीता दुग्गल, माजी मंत्री सुनील भराला, माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप, परफेक्ट फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीता कोडे, पद्मश्री डॉ. शोभना नारायण, सुरेखा लामतुरे, उपभोगता आयोगाचे सिद्धेश्‍वर कानिटकर, टीम जेनिथचे मिथिल कलम्बे, मनीष जी उपस्थित होते. भारतातील विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्‍या महिलांनाही याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन, मुलींवरील हिंसाचार-आव्हाने आणि मार्ग ’ या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार वृषाली कडलग यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख मळा, धांदरफळ येथील उपक्रमशील शिक्षिका म्हणून केलेल्या शैक्षणिक कार्याचा व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट म्हणून दिलेल्या सामाजिक योगदानाचा व महिला सक्षमीकरणासाठी दिलेल्या विशेष योगदानाचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. या कार्यकर्तुत्वाबद्दल ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ ची मान्यता मिळवणार्‍या वृषाली कडलग या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या शिक्षिका ठरल्या आहेत. राष्ट्रीय दर्जा असलेल्या नॅशनल वुमन्स अवॉर्ड किताब पटकविल्यानंतर ’वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन’ यांचे मान्यतेचे प्रमाणपत्र मिळाल्याने अहमदनगर जिल्हा शिक्षण विभागाची मान उंचावली आहे. हा बहुमान मिळाल्यानंतर वृषाली सुनील कडलग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कडलग यांच्या विविध उपक्रमामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनीही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढली आहे. शाळा आयएसओ प्रमाणित करण्याबरोबरच शाळा सौर ऊर्जा प्रकाशित केली आहे. गावातील राजकारणाची जोडे बाजूला ठेवून ग्रामस्थांना एकत्र आणत लोकसहभागातून शाळेचा भौतिक विकास साधण्याची किमया वृषाली कडलग यांनी साधली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्तेमध्येही शाळेने राज्यात आपला नावलौकिक मिळवला आहे प्राप्त केला आहे.
वृषाली कडलग यांनी इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या प्रेसिडेंट म्हणून कुपोषण मुक्त समाज निर्मिती, महिलांमधील कॅन्सर संदर्भात जनजागृती उपक्रम, वयात येणार्‍या मुलींसाठी कळी उमलताना प्रकल्प, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, प्रकल्प प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील 21 शाळांमधून आनंदी शाळा प्रकल्प राबविला आहे. जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजासाठी वधू वर सूचक मेळाव्यांचे आयोजनही त्यांनी केलेले आहे. वृषाली कडलग यांना नाशिक येथील द पॉईंट नाऊ या संस्थेतर्फे द इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2022, मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार, जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. वृषाली कडलग यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

COMMENTS